ETV Bharat / sports

नाशिक महानगरपालिका उचलणार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा ऑलिम्पिकचा खर्च

author img

By

Published : Jan 22, 2020, 6:10 PM IST

Updated : Jan 22, 2020, 9:48 PM IST

येत्या २८ जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर्षवर्धनचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या क्रीडा निधीतून हर्षवर्धनच्या ऑलिम्पिकचा स्पर्धेसाठीचा खर्च देखील महानगरपालिका उचलेल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

Nashik Municipal Corporation will spend money for Maharashtra Kesari Harshavardhan Sadgir
नाशिक महानगरपालिका उचलणार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा ऑलम्पिकचा खर्च

नाशिक - यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी' किताब या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद मिळवत पैलवान हर्षवर्धन सदगीरने नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. ६३ वर्षानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धनच्या रुपाने हा बहुमान नाशिकला मिळाला आहे.

हेही वाचा - बंगळुरुच्या १७ वर्षीय यश अराध्याची गरूडझेप

येत्या २८ जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर्षवर्धनचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या क्रीडा निधीतून हर्षवर्धनच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचा खर्च देखील महानगरपालिका उचलेल असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे. हर्षवर्धनचा नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात यावा, आणि तीन लाख रोख रुपये आणि एक चांदीची गदा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी महासभेपुढे ठेवला होता.

नाशिक महानगरपालिका उचलणार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा ऑलिम्पिकचा खर्च

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. टाहाकारी येथील अंबिका विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत, तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे.

Intro:नाशिक महानगरपालिका उचलणार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा ऑलम्पिकचा खर्च ...

Body:महाराष्ट्र केसरी किताब या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिकचा पाहिलवान हर्षवर्धन सदगीर यांनी स्पर्धेचा बहुमान पटवत नाशिक जिल्ह्याचं नाव उज्वल केलं,63 वर्षानंतर पहिल्यांदाच हा बहुमान मिळवून नाशिकला हर्षवर्धन रूपाने मिळाला,

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित भव्य नागरी सत्कार करण्यात यावा, आणि हर्षवर्धन सदगीर यांना तीन लाख रुपये रोख आणि एक चांदीची गदा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी महासभेपुढे ठेवलाय होता,ह्या प्रस्तवाचा विचार करून येत्या 28 जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, तसेच महानगरपालिकेच्या क्रीडा निधीतून सदगीर त्याच्या पुढील ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचा खर्च देखील महानगरपालिका उचलेल असं महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले..
टीप फीड ftp
nsk harshvardhan sadgir viu 1

Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.