ETV Bharat / sports

नाडाने लाँच केले मोबाईल अ‌ॅप

author img

By

Published : Jun 30, 2020, 6:51 PM IST

रिजीजू म्हणाले, "या उपक्रमाबद्दल मी नाडाचे आभार मानतो. भारतीय खेळांसाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. कारण आपण स्वच्छ खेळासाठी काम करत आहोत. या उपक्रमाची पहिली पायरी म्हणजे लोकांना जागरूक करणे. कोणती औषधे घेऊ नयेत, हे खेळाडूंना कळण्यासाठी हे अॅप आहे."

nada launches app to help athletes about banned substance
नाडाने लाँच केले पहिले मोबाईल अ‌ॅप

नवी दिल्ली - क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी भारताच्या राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीचे (नाडा) पहिले मोबाईल अॅप बाजारात आणले आहे. खेळाडूंना खेळाविषयी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रतिबंधित पदार्थांबद्दल माहिती मिळावी, जेणेकरुन ते कोणतेही चुकीचे कार्य टाळतील, या उद्देशाने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

रिजीजू म्हणाले, "या उपक्रमाबद्दल मी नाडाचे आभार मानतो. भारतीय खेळांसाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. कारण आपण स्वच्छ खेळासाठी काम करत आहोत. या उपक्रमाची पहिली पायरी म्हणजे लोकांना जागरूक करणे. कोणती औषधे घेऊ नयेत, हे खेळाडूंना कळण्यासाठी हे अॅप आहे."

ते पुढे म्हणाले, "या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाडूंना बंदी घातलेल्या पदार्थांची माहिती मिळेल. या माहितीसाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही."

लवकर हे अ‍ॅप खेळाडूंची डोप टेस्ट त्वरित आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या माध्यमातून डोपिंगचे अधिकारी त्यांच्या उपलब्धतेविषयी सांगू शकतील. या कार्यक्रमास क्रीडा सचिव रवी मित्तल आणि नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.