ETV Bharat / sports

Mohammed Shami : मोहम्मद शमीने षटकार ठोकण्यात राहुल द्रविडलासुद्धा टाकले मागे; नवीन विक्रम केला नावावर - Mohammed Shami Surpassed Even Rahul Dravid

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने आपल्या बॅटने चमत्कार केला आहे. कसोटी क्रिकेट सामन्यात षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने राहुल द्रविडलाही मागे टाकले. आजच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या शमीने वेगवान 47 चेंडूत 37 धावांची तडफदार खेळी केली. त्यात त्याने तीन षटकार ठोकत नवीन विक्रम केला आहे.

Mohammed Shami
मोहम्मद शमीने षटकार ठोकण्यात राहुल द्रविडलासुद्धा टाकले मागे; नवीन विक्रम केला नावावर
author img

By

Published : Feb 11, 2023, 5:44 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत 91 धावांवर ऑलआऊट केले. या सामन्यात मोहम्मद शमीने 37 धावांची तुफानी खेळी केली. शमीने या डावात शानदार फलंदाजी करीत तीन षटकार ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मोहम्मद शमीने आता राहुल द्रविडसुद्धा मागे टाकले आहे. इतकेच नाही, तर शमी याबाबतीत अनेक भारतीय दिग्गजांच्याही पुढे गेला आहे. त्याने अनेक भारतीय फलंदाजांना मागे टाकले आहे.

माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टाकले मागे : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने कसोटी फॉर्मेटमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत. या कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या नावावर फक्त २१ षटकार आहेत. त्याच वेळी, त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,889 धावा केल्या आणि त्यात 12 शतके झळकावली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना केवळ 772 धावा केल्या आहेत. मात्र, या फॉरमॅटमध्ये मोहम्मद शमीने 23 षटकार ठोकले आहेत.

कसोटीमध्ये वीरेंद्र सेहवाहगचे सर्वाधिक षटकार : या खेळाडूंनी कसोटीत मारलेल्या सर्वाधिक षटकारमध्ये वीरेंद्र सेहवागने टीम इंडियासाठी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. वीरेंद्र सेहवाहने कसोटी फॉरमॅटमध्ये 104 सामन्यांच्या 180 डावांमध्ये 91 षटकार ठोकले आहेत. यानंतर एमएस धोनीने दुसऱ्या क्रमांकावर कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार ठोकले आहेत.

पाहुया इतर खेळाडूंचे षटकार : यानंतर सचिन तेंडुलकरने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 69 षटकार ठोकले आहेत. कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत शमीने चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या अनुभवी खेळाडूंना मागे टाकले आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये चेतेश्वरने 15 षटकार, मोहम्मद अझरुद्दीनने 19 षटकार आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने केवळ 5 षटकार मारले आहेत.

आज तिसऱ्या दिवशी भारताची तुफान कामगिरी : आज कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 400 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची पुरती गाळण उडवली. भारतीय गोलंदाजांपुढे कांगारुंनी अक्षरश: नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ अवघ्या 91 धावांवर ऑलआऊट झाला. भारताचा 132 धावांनी दणदणीत विजय झाला.

गोलंदाजांची चमकदार कामगिरी : भारताने 400 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दयनीय स्थितीत पोहचली. रविचंद्रन अश्विनची फिरकीची जादू काही थांबायचे नाव घेत नाही. अश्विनने ऑस्ट्रेलिया संघाची वरची फळी अक्षरशः कापून काढली. त्यानंतर उरलेली कामगिरी जडेजा आणि शमीने चोख बजावत उरले-सुरलेले फलंदाज तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलिया अवघ्या 91 धावांवर ऑलआऊट होऊन भारताचा 132 धावांना दणदणीत विजय झाला आहे.

हेही वाचा : Ind vs Aus First Test : भेदक गोलंदाजीने भारतीयांनी कांगारुंना लोळवले; टीम इंडियाचा एक डाव 132 धावांनी शानदार विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.