ETV Bharat / sports

हॅमिल्टनमुळे मर्सिडीजचे सलग सातवे सांघिक जेतेपद - lewis hamilton and mercedes news

मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला आहे. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकेल शुमाकरसह सलग सहा संघ विजेतेपदे जिंकली होती.

Mercedes clinch seventh consecutive constructors' title after lewis hamilton's win at lmola
हॅमिल्टनमुळे मर्सिडीजचे सलग सातवे सांघिक जेतेपद
author img

By

Published : Nov 2, 2020, 5:20 PM IST

इमोला - रविवारी इमोला सर्किटमध्ये झालेल्या शर्यतीत विजय मिळवत लुईस हॅमिल्टनने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचा किताब आपल्या नावावर केला. या विजयासह हॅमिल्टनने आपल्या संघाला म्हणजेच मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद मिळवून दिले.

  • All of the elements aligned on this momentous day. Mercedes just claimed their 7th Constructors’ Championship! 🏆 To everyone back at the factory grafting away and continuing to push and innovate. You guys are the true unsung heroes. Let’s continue to make history together🙏🏾 pic.twitter.com/LB9HTg8Zq7

    — Lewis Hamilton (@LewisHamilton) November 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला आहे. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकेल शुमाकरसह सलग सहा विजेतेपदे जिंकली होती.

या शर्यतीत हॅमिल्टनचा वाल्टेरी बोटास दुसर्‍या स्थानी तर रेनोचा डॅनियल रिकियाड्रेने तिसरा क्रमांक मिळवला. गेल्या आठवड्यात हॅमिल्टनने पोर्तुगाल ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली होती.

हॅमिल्टनचा विक्रम -

ब्रिटिश चालक लुईस हॅमिल्टनने पोर्तुगाल ग्रँड प्रिक्स स्पर्धा नवीन इतिहास रचला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील 92वा विजय मिळवत जर्मनीचा महान चालक मायकेल शुमाकरच्या विक्रमाला मागे टाकत नवीन विक्रमाची नोंद केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.