नवी दिल्ली - चीनमध्ये रंगलेल्या आईएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी इतिहास रचला. भारतीय नेमबाज मनू भाकेर, एल्वनिल वलरिवन आणि दिव्यांश पनवार यांनी वेगवेगळ्या गटातून सुवर्णपदकाची कमाई केली. मनूने १० मीटर एअर पिस्तुल आणि एल्वनिलने १० मीटर एअर रायफल प्रकारात पदक पटकावले. तर १७ वर्षीय दिव्यांश सिंग पनवार यानेही १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
मनूने १० मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत २४४.७ गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला. तर या प्रकारात सर्बियाच्या खेळाडूला रौप्य तर चीनच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- https://twitter.com/OfficialNRAI/status/1197397014226571264
दुसरीकडे एल्वनिलने १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत २५०.८ गुणांची कमाई केली. या प्रकारात तैवानच्या नेमबाजपटूला रौप्य तर रोमानियाच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताचा १७ वर्षीय दिव्यांश सिंग पनवार याने १० मीटर एअर रायफल प्रकरात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या प्रकारात अंतिम फेरीत २५०.१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावले.
-
TRIPLE GOLD! 🥇 🥇 🥇 it’s #DivyanshPanwar now! The teenager strikes India’s 3rd 🥇 of the day winning the Men’s 10m Air Rifle at the @ISSF_Shooting World Cup finals. Indian teenagers on 🔥 #ISSFWorldCupFinal 🇮🇳🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/LnQT7XprDa
— NRAI (@OfficialNRAI) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">TRIPLE GOLD! 🥇 🥇 🥇 it’s #DivyanshPanwar now! The teenager strikes India’s 3rd 🥇 of the day winning the Men’s 10m Air Rifle at the @ISSF_Shooting World Cup finals. Indian teenagers on 🔥 #ISSFWorldCupFinal 🇮🇳🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/LnQT7XprDa
— NRAI (@OfficialNRAI) November 21, 2019TRIPLE GOLD! 🥇 🥇 🥇 it’s #DivyanshPanwar now! The teenager strikes India’s 3rd 🥇 of the day winning the Men’s 10m Air Rifle at the @ISSF_Shooting World Cup finals. Indian teenagers on 🔥 #ISSFWorldCupFinal 🇮🇳🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/LnQT7XprDa
— NRAI (@OfficialNRAI) November 21, 2019
दरम्यान, १० मीटर पिस्तुल प्रकारात भारताची यशस्विनी सिंहने सहावा क्रमांक पटकावला. तर १० मीटर रायफल प्रकारात भारताच्या मेहुली घोषला अंतिम फेरीत सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.
पुरुष गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीत गाठली होती. मात्र, त्यांना पदक जिंकता आले नाही.
हेही वाचा - 'डायमंड कप इंडिया-2019' बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक
हेही वाचा - १४ वर्षाच्या ईशा सिंगचा पराक्रम, आशियाई नेमबाजी स्पर्धेत जिंकली ३ सुवर्णपदके