नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा मल्ल राहुल आवारेने विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोरदार मुसंडी मारली आहे. आवारेने ६१ किलो वजनी गटात ही कामगिरी केली.
-
An amazing day for India in Wrestling 🤼♂️
— The SportsGram India 🇮🇳 (@SportsgramIndia) September 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Deepak Punia into SF + Olympic Quota secured 👏
Rahul Aware into SF in 61 kg 👏
Jitender & Mausam Khatri still have a chance of getting in through Repechage!#WrestleNurSultan | #wrestling pic.twitter.com/vVGyBy1wlY
">An amazing day for India in Wrestling 🤼♂️
— The SportsGram India 🇮🇳 (@SportsgramIndia) September 21, 2019
Deepak Punia into SF + Olympic Quota secured 👏
Rahul Aware into SF in 61 kg 👏
Jitender & Mausam Khatri still have a chance of getting in through Repechage!#WrestleNurSultan | #wrestling pic.twitter.com/vVGyBy1wlYAn amazing day for India in Wrestling 🤼♂️
— The SportsGram India 🇮🇳 (@SportsgramIndia) September 21, 2019
Deepak Punia into SF + Olympic Quota secured 👏
Rahul Aware into SF in 61 kg 👏
Jitender & Mausam Khatri still have a chance of getting in through Repechage!#WrestleNurSultan | #wrestling pic.twitter.com/vVGyBy1wlY
हेही वाचा - भूकेल्या रोनाल्डोला जेवण देणारी 'ती' महिला सापडली...
पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या आवारेने तुर्कमेनिस्तानच्या केरीम होजाकोला हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने होजाकोला तांत्रिक गुणांच्या आधारावर १३-२ ने सहज मात दिली. त्यानंतर अत्यंत रोमहर्षक झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत आवारेने कझाकिस्तानच्या रासुल कालियेवरा १०-७ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत आवारेचा सामना जॉर्जियाच्या बेको लोमताड्झेशी होणार आहे.
दुसरीकडे, ८६ किलो वजनी गटात भारताच्या दिपक पुनियाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस इज्किर्डोला ७-६ ने हरवले. शिवाय पुनियाने पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत पुनियाचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टेफन रीचमुथशी होणार आहे.
तत्पूर्वी, ७९ किलो वजनी गटात भारताच्या जितेंद्रने विजयी आरंभ केला होता. त्याने पहिल्या फेरीत मोल्डोवाच्या घेओरघी पास्कलोवला ७-२ ने धूळ चारली होती मात्र, उपांत्यपूर्व फेरीत जितेंद्रला स्लोव्हाकिआच्या ताजमुराझ सालकाझानोवने ४-० असे हरवले.