ETV Bharat / sports

'आपण भाषणबाजीत पुढे, १३५ कोटी लोकसंख्येच्या भारताला ऑलम्पिकमध्ये यश नाही'

२३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेला आज पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. राज्याचे राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मोठ्या थाटात या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

maharashtra Governor bhagat singh koshyari Inaugaration of Maharashtra State Inter University Sports Competition
आपण केवळ भाषणबाजीत पुढे, १३५ कोटी लोकांच्या देशात ऑलम्पिकमध्ये यश नाही - कोश्यारी
author img

By

Published : Dec 26, 2019, 5:54 PM IST

Updated : Dec 26, 2019, 7:52 PM IST

सोलापूर - आपण केवळ भाषणबाजीतच पुढे आहोत, मात्र जवळपास १३५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलम्पिकसह अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही याची खंत वाटते, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी केले, ते सोलापुरात बोलत होते.

२३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेला आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. राज्याचे राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मोठ्या थाटात या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आपली ही खंत व्यक्त केली आहे.

२३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेविषयी माहिती देताना आमचे प्रतिनिधी प्रविण सपकाळ...

या प्रसंगी कोश्यारी म्हणाले, 'आपण केवळ भाषणबाजीतच पुढे आहोत, मात्र जवळपास १३५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलम्पिकसह अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही याची खंत वाटते. एवढेचं नाही मी ज्या राज्याचा राज्यपाल आहे, तो महाराष्ट्रदेखील खेळाच्या बाबतीत मागे आहे.'

यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस या व्यासपीठावर उपस्थित होत्या. राज्यपाल कोश्यारी यांनी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राविषयी अनास्था बाळगणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा - सफाई कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश, राज्यातून दहाव्या क्रमांंकावर उत्तीर्ण

हेही वाचा - विज्ञान केंद्राकडून ग्रहण पाहण्यासाठी विशेष सोय, सोलापूरच्या महापौरांनीही पाहिले सूर्यग्रहण

Intro:Ready 2 USE.

सोलापूर : आपण केवळ भाषणबाजीतच पुढे आहोत मात्र एकशे पस्तीस कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलम्पिकसह अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही याची खंत वाटते.असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोशायरी यांनी बोलून दाखवली आहे.एवढचं नाही आपण ज्या राज्याचे राज्यपाल आहोत तो महाराष्ट्र देखील खेळाच्या बाबतीत मागे असल्याची खंतही कोशायरी यांनी यावेळी बोलून दाखवली.

Body:23 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना आज सोलापुरातल्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. राज्याचे राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोशायरी यांच्या हस्ते मोठ्या थाटात या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना कुलपती भगतसिंग कोशायरी यांनी आपली ही खंत व्यक्त केली आहे.यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

Conclusion:राज्यपाल कोशायरी यांनी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडाक्षेत्राविषयी अनास्था बाळगणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.यातून ही सरकार काय बोध घेतात ते येणारा काळच सांगेल.
Last Updated : Dec 26, 2019, 7:52 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.