नवी दिल्ली: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी चमकदार सुरु आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. या कामगिरीची दखल घेत पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंचे लोकसभेने अभिनंदन केले ( Lok Sabha congratulates Indian medal winners ) आहे. सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदक विजेत्यांची नावे घेतली आणि संपूर्ण सभागृहाच्या व त्यांच्या बाजूने त्यांचे अभिनंदन केले.
यासोबतच त्यांनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Lok Sabha Speaker Om Birla ) यांनी मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शिउली यांचे भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
-
India has won three gold medals, two silver medals and a bronze medal in the ongoing CWG 2022, till now. I am confident that the performance of Indian players in the Commonwealth Games will inspire the youth of the country: Lok Sabha Speaker Om Birla pic.twitter.com/XKjeotdML3
— ANI (@ANI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India has won three gold medals, two silver medals and a bronze medal in the ongoing CWG 2022, till now. I am confident that the performance of Indian players in the Commonwealth Games will inspire the youth of the country: Lok Sabha Speaker Om Birla pic.twitter.com/XKjeotdML3
— ANI (@ANI) August 1, 2022India has won three gold medals, two silver medals and a bronze medal in the ongoing CWG 2022, till now. I am confident that the performance of Indian players in the Commonwealth Games will inspire the youth of the country: Lok Sabha Speaker Om Birla pic.twitter.com/XKjeotdML3
— ANI (@ANI) August 1, 2022
तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल संकेत सरगर आणि बिंदिया राणी आणि कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुरूराज पुजारी यांचेही त्यांनी अभिनंदन केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी देशातील तरुणांना विशेषत: युवा खेळाडूंना प्रेरणा देईल, असे सांगितले. बिर्ला यांनी आपल्या आणि सभागृहाच्या वतीने पदक जिंकल्याबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतानाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंनाही विजयासाठी शुभेच्छा दिल्या ( Lok Sabha Speaker Om Birla congratulates medal winners ) आहेत.
हेही वाचा - Cwg 2022 Medal Tally : सहा पदकांसह भारत पोहोचला पदकतालिकेत सहाव्या स्थानावर