इटली - मर्सिडीज चालक लुईस हॅमिल्टनने शनिवारी टस्कन ग्रँड प्रिक्स येथे पोल पोझिशन मिळवली. त्याच वेळी, हॅमिल्टनचा संघसहकारी वाल्टेरी बोटासने दुसरे स्थान पटकावले. पहिल्या क्वार्टरमध्ये बोटासने आघाडी घेतली. तर, तिसऱ्या क्वार्टरमध्ये हॅमिल्टन आघाडीवर होता. रेनॉल्टच्या इस्टेबन ओकनशी धडक बसल्यामुळे बोटास पिछाडीवर पडला. हॅमिल्टनने कारकिर्दीतील ९५वी वेळी पोल पोझिशन मिळवली आहे. रेड बुलचा मॅक्स व्हस्टार्पेन तिसऱ्या आणि त्याचा साथीदार अॅलेक्स अल्बॉन चौथ्या स्थानावर राहिला आहे.
-
He didn't have much time to enjoy the scenery! 😃@LewisHamilton sets a new track record at Mugello, and notches a 95th career pole 🚀#TuscanGP 🇮🇹 @pirellisport pic.twitter.com/5y1O0Wp58u
— Formula 1 (@F1) September 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">He didn't have much time to enjoy the scenery! 😃@LewisHamilton sets a new track record at Mugello, and notches a 95th career pole 🚀#TuscanGP 🇮🇹 @pirellisport pic.twitter.com/5y1O0Wp58u
— Formula 1 (@F1) September 12, 2020He didn't have much time to enjoy the scenery! 😃@LewisHamilton sets a new track record at Mugello, and notches a 95th career pole 🚀#TuscanGP 🇮🇹 @pirellisport pic.twitter.com/5y1O0Wp58u
— Formula 1 (@F1) September 12, 2020
फेरारीचा चार्ल्स लेक्लर्कने पहिल्या पाचमध्ये राहिला. ही फेरारीची ऐतिहासिक एक हजारावी शर्यत आहे. त्याचा सहकारी आणि चार वेळाचा चॅम्पियन सेबस्टियन व्हेटेल दुसर्या क्वार्टरमध्ये पुढे जाऊ शकला नाही. तो १४व्या स्थानावर राहिला.
हॅमिल्टन ब्रिटिश ग्रां. प्री.चाही विजेता -
लुईस हॅमिल्टनने कारकिर्दीतील विक्रमी सातवी ब्रिटिश ग्रां. प्री. शर्यत जिंकली आहे. शेवटच्या लॅपमध्ये टायर पंक्चर झाल्यानंतरही हॅमिल्टनने विजेतेपद मिळवले. या शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे स्थान राखले. त्याने हॅमिल्टनपेक्षा सहा सेकंद अधिक घेतले. फेरारीचा चार्ल्स लेक्लर्क तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हॅमिल्टनचा संघसहकारी वाल्टेरी बोटासच्याही गाडीचाही टायर पंक्चर झाला. त्याला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.