ETV Bharat / sports

Tennis Player Aishwarya Jadhav : विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरातील टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची आशियाई संघात निवड - Kolhapur News

कोल्हापूरातील टेनिसपटू ऐश्वर्या जाधव ( Tennis Player Aishwarya Jadhav ) हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाली आहे. या आशियाई संघात निवड होणारी ती देशातील एकमेव खेळाडू ठरली आहे.

Aishwarya Jadhav
Aishwarya Jadhav
author img

By

Published : Jun 8, 2022, 5:54 PM IST

कोल्हापूर: आशियन टेनिस फेडरेशनच्यावतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी ( Wimbledon Competition ) कोल्हापूरातील टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड ( Aishwarya Jadhav selected in the Asian team ) झाली आहे. या आशियाई संघात निवड होणारी ती देशातील एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या निवडणीनंतर संपूर्ण कोल्हापुरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतून निवड -

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात ( Team selection from WTC ) आली आहे. ऐश्वर्यासह जपान, कझाकिस्तान, कोरिया येथील चार खेळाडूंचा या संघात समावेश आहे. ऐश्वर्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा ऐश्वर्याचे आई वडील तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत. ऐश्वर्याने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत तिने स्वतःसह कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी घेतली ऐश्वर्याची भेट -

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ऐश्वर्याच्या ( MLA Ruturaj Patil Meet Aishwarya ) निवडीची माहिती मिळताच, तिच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी तिच्याकडून विम्बल्डन स्पर्धेसंदर्भात त्यांनी माहिती सुद्धा जाणून घेत तिच्या तयारी विषयी चौकशी केली. तसेच, या स्पर्धेसाठी तिला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच या स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - Rajya Sabha Election : धनंजय महाडिकांची राज्यसभेसाठी उमेदवारी अन् बंटी पाटलांचा अॅक्टिव्ह मोड; कोल्हापुरातील राजकाण तापले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.