ETV Bharat / sports

बास्केटबॉलच्या ‘किंग’चा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

author img

By

Published : Apr 5, 2020, 8:26 PM IST

कोबी आणि बोमन यांच्या व्यतिरिक्त सात व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. टिम डंकन, केव्हिन गार्नेट, रुडी टोमजानोविच, तमिका कॅचिंग्ज, किम मालकी, बार्बरा स्टीव्हन्स आणि एडी सट्टन यांनीही या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवले आहे.

Kobe Bryant inducted into nbas hall of fame
बास्केटबॉलच्या ‘किंग’चा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

वॉशिंग्टन - बास्केटबॉलमधील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंट आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाचे माजी महासचिव पॅट्रिक बोमन यांना मरणोत्तर बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. कोबी आणि बोमन यांच्या व्यतिरिक्त सात व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

या दोघांव्यतिरिक्त टिम डंकन, केव्हिन गार्नेट, रुडी टोमजानोविच, तमिका कॅचिंग्ज, किम मालकी, बार्बरा स्टीव्हन्स आणि एडी सट्टन यांनीही या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवले आहे.

बास्केटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला. आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत कोबीने अनेक विक्रम नोंदवले होते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएकडून खेळताना त्याने ५ स्पर्धाही खिशात टाकल्या होत्या.

कोबीने १८ वेळा 'एनबीए ऑल स्टार'चा किताब पटकावला होता. २०१६ कोबीने निवृत्ती जाहीर केली. २०१२ आणि २००८च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी कोबीने दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.