ETV Bharat / sports

CWG 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे थोडक्यात हुकले सातवे पदक; चौथ्या स्थानी राहिलेला कोण आहे अजय सिंग? घ्या जाणून - Weightlifter Ajay Singh

वेटलिफ्टिंगमध्ये, अजय सिंग पुरुषांच्या 81 किलो गटाच्या अंतिम फेरीत पदक मिळवण्यापासून वंचित राहिला आणि त्यात चौथ्या स्थानावर राहिला. अजयने स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये 176 किलो वजन उचलताना. त्याने एकूण 319 किलो वजन उचलले, तर तिसरे स्थान मिळवणाऱ्या ( CWG 2022 ) कॅनडाच्या निकोलस वाचोनने 320 किलो वजन उचलले.

Ajay Singh
अजय सिंग
author img

By

Published : Aug 1, 2022, 6:59 PM IST

बर्मिंगहॅम: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अजय सिंगने ( Weightlifter Ajay Singh ) चमकदार कामगिरी केली, पण देशाला 7 वे पदक मिळवून देण्यापासून अजयला मुकावे लागले. वेटलिफ्टिंगमध्ये 25 वर्षीय अजय सिंगने एकूण 319 किलो वजन उचलले, पण त्याला पदक मिळवता आले नाही.

पुरुषांच्या 81 किलो वजनी गटात तो चौथ्या स्थानावर राहिला. त्याने स्नॅचमध्ये 143 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 176 किलो वजन उचलले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सहा पदके जिंकली आहेत आणि सर्वच पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. अजयने 2021 मध्ये उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने 81 किलो वजनी गटात एकूण 322 किलो वजन उचलले. या कामगिरीच्या जोरावर त्याला बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये ( Birmingham Commonwealth Games 2022 ) स्थान मिळाले.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) सुरू होण्याच्या एक महिना आधी अजय बर्मिंगहॅमला पोहोचला होता. तेथे त्याने प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली होती. अजयसाठी इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो जवळपास एक दशकापासून तयारी करत आहेत. यावेळी त्याचे पदक हुकले असले तरी आगामी स्पर्धांमध्ये त्याच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अजय सिंग शेखावत ( Weightlifter Ajay Singh Shekhawat ) यांने वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. त्याने सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली. तेव्हापासून तो येथे प्रशिक्षण घेत आहे. अजय सिंग हा भारतीय सैन्यातील राजपुताना रायफल्सचाही एक भाग आहे. अजय सिंग यांचे वडीलही लष्करात सुभेदार राहिले आहेत.

अजयने 2011 ते 2014 या कालावधीत सातत्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. 2015 च्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक आणि वरिष्ठ राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील 77 किलो गटात त्याने 305 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. यानंतर, 2017 मध्ये त्याली महाराणा प्रताप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यानी आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

हेही वाचा - Cwg 2022: लॉन बॉलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर विजय; अंतिम फेरीत दाखल झाल्याने पदक निश्चित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.