ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: विली ते लाएब पर्यंत, जाणून घ्या फिफा विश्वचषकातील शुभंकरांबद्दल - जाणून घ्या फिफा विश्वचषकातील शुभंकरांबद्दल

प्रत्येक फिफा विश्वचषकासाठी शुभंकर (FIFA Mascots) कधी तज्ञांनी निवडले तर कधी चाहत्यांनी त्यासाठी मत दिले होते. शुभंकरची सुरुवात 1966 साली इंग्लंडमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकापासून झाली आणि तेव्हापासून फिफा विश्वचषकाच्या इतिहासात आत्तापर्यंत 15 शुभंकर झाले आहेत. चला तर मग बघूया शुभंकर कधी आणि कसे सादर झाले.. (history of FIFA Mascots).

FIFA Mascots
FIFA Mascots
author img

By

Published : Nov 16, 2022, 5:23 PM IST

नवी दिल्ली: तसे पाहिले तर फुटबॉल विश्वचषक 1930 मध्येच सुरू झाला होता. परंतु या खेळाला पहिला शुभंकर (FIFA Mascots) 1966 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषकात मिळाला. विविध शुभंकर हे फिफा विश्वचषकाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्वाचा भाग आहेत. विशेषतः तरुण आणि मुलांमध्ये हे खूप लोकप्रिय आहेत. शुभंकर केवळ विश्वचषकाला प्रोत्साहनच देत नाही तर लोकांच्या मनोरंजनाचे केंद्रही बनले आहे. प्रत्येक विश्वचषकासाठी तज्ज्ञांकडून विविध शुभंकर निवडले जातात आणि त्यानंतर चाहत्यांच्या मतदानाने त्यातील एकाची निवड केली जाते. शुभंकरची सुरुवात झाल्यापासून विश्वचषकाच्या इतिहासात आत्तापर्यंत 15 शुभंकर झाले आहेत. चला तर मग बघूया शुभंकर कधी आणि कसे सादर झाले..(history of FIFA Mascots). (FIFA World Cup 2022).

1) 1966 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकापासून शुभंकरची सुरुवात झाली तेव्हा 'विली' नावाचा पहिला शुभंकर लोकांसमोर आला. तो एक सिंह होता. युनियन जॅकची थीम असलेला टी-शर्ट घालण्यासाठी तो बनवण्यात आला होता. फ्रीलान्स आर्टिस्ट रेग हॉय विली याने त्याची रचना केल्याचे सांगितले जाते. विश्वचषकाच्या इतिहासात हा एक माईलस्टोन आहे. यानंतर आगामी स्पर्धांमध्ये देखील शुभंकरांची निवड करण्यात आली आणि शुभंकरांना स्पर्धेचा अविभाज्य भाग बनवण्यात आले.

FIFA Mascots
विली' नावाचा पहिला शुभंकर

2) यानंतर 1970 मध्ये मेक्सिकोमध्ये फुटबॉलचा विश्वचषक झाला तेव्हा यजमान देशाच्या रंगात रंगवलेला एक मेक्सिकन मुलगा 'जुआनिटो' शुभंकर म्हणून आला होता. तो त्याच्या स्टायलिश लूक मुळे खूप लोकप्रिय झाला होता.

FIFA Mascots
मेक्सिकन मुलगा 'जुआनिटो'

3) त्यानंतर पुढील फिफा विश्वचषक 1974 मध्ये पश्चिम जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फिफा विश्वचषकात 'टिप आणि टॅप' या दोन मुलांचा शुभंकर म्हणून स्वीकार करण्यात आला.

FIFA Mascots
'टिप आणि टॅप' या दोन मुलांचा शुभंकर म्हणून स्वीकार

4) अर्जेंटिना येथे झालेल्या 1978 च्या विश्वचषकासाठी एका तरुण कुशल रायडरची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली. त्याचे नाव 'गौचितो' असे ठेवण्यात आले. 'गचितो' कडे पिवळा रुमाल आणि चाबूक होता, जो दक्षिण अमेरिकन देशांतील कुशल घोडेस्वारांचे प्रतीक आहे.

FIFA Mascots
'गौचितो'

5) 1982 च्या फिफा विश्वचषकाच्या वेळी स्पेनने परंपरेत थोडा बदल करून शुभंकर म्हणून एक फळ सादर केले. जगाला 'नारंजितो' नावाचा शुभंकर स्पॅनिश जर्सीत हसताना दिसला.

FIFA Mascots
'नारंजितो' नावाचा शुभंकर

6) 1986 मध्‍ये मेक्सिकोमध्‍ये आयोजित विश्‍वचषक स्पर्धेत भाजीपालाच्‍या शेतात शुभंकर सादर केल्या गेला. मेक्सिकोने त्याला 'पीक' असे नाव दिले. ही मेक्सिकोची प्रसिद्ध मिरची आहे, जी मेक्सिकन फूडमध्ये भरपूर वापरली जाते. त्याची टोपी खूप लोकप्रिय झाली होती.

FIFA Mascots
'पीक'

7) 1990 मध्ये इटलीमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा पार पडली. यादरम्यान एक अनोखा शुभंकर तयार करण्यात आला आणि त्याला 'सियाओ' असे नाव देण्यात आले. त्याचे शरीर इटालियन रंगांच्या चौकोनी ब्लॉक्सपासून बनवले गेले होते, ज्याला लवचिक स्टिक रक फुटबॉलचा आधार होता. त्याला स्टिक प्लेअरचे स्वरूप देण्यात आले.

FIFA Mascots
'सियाओ'

8) 1994 साली अमेरिकेत फिफा विश्वचषक स्पर्धा पार पडली त्यावेळी विश्वचषकाचा शुभंकर 'स्ट्रायकर' बनवण्यात आला. पाळीव कुत्र्याला अमेरिकन लोकांनी पसंती दिली होती. या शुभंकरने अमेरिकन राष्ट्रध्वजाचा रंग परिधान केला होता.

FIFA Mascots
शुभंकर 'स्ट्रायकर'

9) यानंतर 1998 मध्ये फ्रान्समध्ये फिफा विश्वचषक झाला तेव्हा फ्रान्सचे राष्ट्रीय चिन्ह कोंबड्याच्या प्रतिमेवर आधारित विश्वचषकाचा शुभंकर 'फुटिक्स' तयार करण्यात आला. तो फ्रेंचांच्या निळ्या रंगात रंगला होता. त्याने हातात किट आणि फुटबॉल धरले होते. तर त्याच्या छातीवर 'फ्रान्स 98' असे लिहिले होते.

FIFA Mascots
'फुटिक्स'

10) 2002 मध्ये जपान आणि कोरिया सह-यजमान असलेल्या फिफा विश्वचषकात 'इटो', 'काझ' आणि 'निक' नावाच्या तीन शुभंकरांची थीम होती. हे तिन्ही खेळाडू फुटबॉलसोबत दिसले. ते नवीन युगाच्या आगमनाचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले जाते.

FIFA Mascots
'इटो', 'काझ' आणि 'निक' नावाच्या तीन शुभंकरांची थीम

11) यानंतर 2006 मध्ये जर्मनीमध्ये पुढील फिफा विश्वचषक खेळला गेला. यामध्ये गोल आणि लिओचा शुभंकर 'गोलिओ' याची निवड करण्यात आली. हा शुभंकर म्हणजे जर्मन संघाचा टी-शर्ट घातलेला एक सिंह होता त्याच्या एका हातात फुटबॉल होता.

12) फिफा विश्वचषक 2010 दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. बिबट्यांची मुबलक संख्या असलेल्या या देशात त्यांच्यावरंच आधारित एक शुभंकर तयार केला गेला. त्याला 'जाकुमी' असे नाव देण्यात आले. तो हिरव्या आणि सोनेरी रंगात उभा राहून लोकांना अभिवादन करताना दिसला.

FIFA Mascots
जाकुमी

13) फिफा विश्वचषक 2014 ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या देशातील अनेक देशी प्रजाती नष्ट होत आहेत हे लक्षात घेऊन त्यावर आधारित स्पेशल शुभंकर बनवण्यात आला होता. फुटबॉल आणि पर्यावरणाच्या मिश्रणाचा संदेश देत या शुभंकराला 'फुलेको' असे नाव देण्यात आले होते. यात ब्राझीलच्या ध्वजाच्या रंगांचा देखील समावेश होता.

FIFA Mascots
'फुलेको'

14) रशियातील 2018 च्या विश्वचषकातही प्राण्यांच्या चिन्हांचा ट्रेंड दिसून आला. या वेळचा शुभंकर लांडग्यावर आधारित होता. त्याला 'जबविका' असे नाव देण्यात आले. जगभरात इंटरनेटवर सार्वजनिक मतदान करून त्याची निवड करण्यात आली होती.

FIFA Mascots
'जबविका'

15) स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच, कतार 2022 मध्ये शुभंकर वेशभूषेत दिसणार आहे. त्याला 'लायब' असे नाव देण्यात आले आहे. अरबी भाषेत 'लायब' म्हणजे 'सुपर-कुशल खेळाडू'. ज्याला अरब पुरुषांनी परिधान केलेल्या पारंपारिक शिरोभूषणाशी जोडण्यात आले आहे.

FIFA Mascots
FIFA World Cup 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.