गुवाहाटी - खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने पदकाचे द्विशतक करत पदकतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. महाराष्ट्राने या स्पर्धेत आतापर्यंत २०४ पदके जिंकली आहे. यात ६३ सुवर्ण, ६२ रौप्य आणि ७९ कांस्यपदकाचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी सोमवारी एका दिवसात ३ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सहा पदके जिंकली.
- केनिशा गुप्ताने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात २०० मीटर्स वैयक्तिक मिडले रिले शर्यत २ मिनिटे २५.८० सेकंदांत जिंकली. तिचीच सहकारी अपेक्षा फर्नान्डीस हिने रौप्यपदक पटकाविले. केनिशा आणि अपेक्षा यांनी करिना शांता आणि पलक धामी यांच्या साथीत (१७ वर्षांखालील) ४ बाय १०० मीटर मिडले रिले शर्यतीचेही सुवर्णपदक पटकावले.
- मुलांच्या १७ वर्षांखालील गटात वेदांत बापनाने २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याच वयोगटात सुश्रूत कापसेने ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले.
वेटलिफ्टिंग -
- महाराष्ट्राच्या रितेश म्हैसाळने युवा गटाच्या ८९ किलो विभागात रौप्यपदक पटकावले. तर त्याचाच सहकारी सानिध्य मोरे याला याच विभागात कांस्यपदक मिळाले.
- मुलींच्या युवा ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या श्रेया गणमुखी हिने रौप्यपदकाची कमाई केली. तर कनिष्ठ मुलींच्या ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या करुणा गढे हिला कांस्यपदक मिळाले.
हेही वाचा - बारावीत शिकणाऱ्या मुलीने कुस्तीमध्ये मुलाला केले चितपट
हेही वाचा - Khelo India : महाराष्ट्राने खो-खो, जलतरण, कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली सुवर्णपदकं