ETV Bharat / sports

Khelo India : महाराष्ट्राने जलतरण, वेटलिफ्टिंगसह मुष्टीयुद्ध प्रकारात जिंकलं सुवर्ण - खेलो इंडिया युथ गेम्स २०२०

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरण क्रीडा प्रकारात आपला दबदबा कायम राखला. जलतरणपटू अपेक्षा फर्नाडिस, केनिशा गुप्ता आणि मिहीर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले.

khelo india youth games 2020 : maharashtra team ahead swimming
जलतरणपटू अपेक्षा फर्नाडिस
author img

By

Published : Jan 22, 2020, 7:33 AM IST

Updated : Jan 22, 2020, 7:41 AM IST

गुवाहाटी - खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरण क्रीडा प्रकारात आपला दबदबा कायम राखला. जलतरणपटू अपेक्षा फर्नाडिस, केनिशा गुप्ता आणि मिहीर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये साताऱ्याच्या वैष्णवी पवार हिने सुवर्णपदक जिंकले. तर जळगावच्या दिशा पाटीलने १७ वर्षांखालील ६३ किलो मुष्टीयुद्ध क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.

जलतरण -

  • अपेक्षाने १७ वषार्खालील मुलींच्या २०० मीटर्स बटरफ्लाय व ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या करिना शांताने रौप्य तर झारा जब्बार हिने कांस्य पदकाची कमाई केली. केनिशाने १७ वर्षाखालील गटात ५० मीटर्स फ्री स्टाईलमध्ये विजेतेपद पटकाविले.
  • मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मिहिरने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यत जिंकली. रुद्राक्ष मिश्राने कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राने २१ वषार्खालील गटात ४ बाय १०० मीटर्स फ्री स्टाईल रिले स्पर्धा जिंकली. या संघात रुद्राक्ष, मिहिर, सुचित पाटील व एरॉन फर्नांडिस यांचा समावेश आहे.

वेटलिफ्टिंग -

  • ८१ किलो वजनी गटात वैष्णवीने १३४ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ६२ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ७२ किलो वजन उचलले.

मुष्टीयुद्ध -

  • दिशा पाटीलने १७ वर्षांखालील ६३ किलो मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. तर औरंगाबादच्या शर्वरी कल्याणकरला ७० किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

टेनिस -

  • टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या ध्रुव सुनिश व अथर्व शर्मा यांनी मुलांच्या २१ वर्षांखालील गटात कांस्यपदक पटकावले. त्यांनी हरयाणाच्या आकाश अहलावत आणि अमित बेनिवाल यांचा ६-१, ६-१ असा पराभव केला.

हॉकी -

  • महाराष्ट्राच्या मुलींनी २१ वर्षांखालील गटात मिझोरामचा १-० ने पराभव करत कांस्यपदकाची कमाई केली. सामन्यातील एकमात्र गोल पूजा शेंडगे हिने केला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 7:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.