ETV Bharat / sports

100M Hurdles in UK :ज्योती याराजीने यूकेमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत स्वतःचाच मोडला राष्ट्रीय विक्रम - कोण ज्योती याराजी

आंध्र प्रदेशातील 22 वर्षीय ज्योतीने रविवारी 13.11 सेकंदाच्या वेळेसह 13.23 सेकंदांचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम सुधारला ( Jyoti Yaraji broke the national record ), जो तिने 10 मे रोजी लिमासोल येथे सायप्रस आंतरराष्ट्रीय मीट दरम्यान सेट केला होता.

Jyoti Yaraji
Jyoti Yaraji
author img

By

Published : May 23, 2022, 8:52 PM IST

नवी दिल्ली: भारताच्या ज्योती याराजीने ब्रिटनमधील लॉफबरो येथे आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स मीटमध्ये विजेतेपदाच्या दरम्यान स्पर्धेत दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम मोडला ( Jyoti Yaraji broke her own national record ). आंध्र प्रदेशातील 22 वर्षीय ज्योतीने रविवारी 13.11 सेकंदाच्या वेळेसह 13.23 सेकंदांचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम सुधारला, जो तिने 10 मे रोजी लिमासोल येथे सायप्रस आंतरराष्ट्रीय मीट दरम्यान सेट केला होता.

भुवनेश्वरमधील रिलायन्स फाऊंडेशन ओडिशा अॅथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये जोसेफ हिलियर यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेल्या ज्योतीने अनुराधा बिस्वालचा 13.38 सेकंदांचा विक्रम मोडला. जो 2002 मध्ये सेट झाला होता. ज्योतीने गेल्या महिन्यात कोझिकोड येथील फेडरेशन चषक स्पर्धेत 13.09 सेकंदांची वेळ नोंदवली ( Federation Cup recorded 13.09 seconds ) होती, परंतु त्यानंतर वेळ नोंदवण्यासाठी वैध मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे तिची वेळ नोंदवली गेली नाही आणि तो राष्ट्रीय विक्रम मानला गेला नाही. त्या वेळी वाऱ्याचा वेग अधिक 2.1 मीटर प्रति सेकंद होता जो अधिक दोन मीटर प्रति सेकंद या स्विकार्य मर्यादेपेक्षा जास्त होता.

ज्योतीने 2020 मध्ये 13.03 सेकंदांचा वेळ नोंदवला होता, कर्नाटकातील मूडबिद्री येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये ( All India Inter University Championship ) बिस्वालच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा चांगला होता, परंतु तरीही तो राष्ट्रीय विक्रम मानला गेला नाही. कारण स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीने तिची चाचणी केली नव्हती. तसेच भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे तांत्रिक प्रतिनिधीही तेथे उपस्थित नव्हते.

ज्योतीचे वडील सूर्यनारायण हे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, तर तिची आई कुमारी लोकांच्या घरची कामे करतात. ओडिशा अॅथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरचे आणखी एक प्रशिक्षणार्थी, अमलान बोरगोहेनने 21.27 च्या वेळेसह 200 मीटर शर्यतीत पाचवे स्थान पटकावले.

इतर निकालांमध्ये, राष्ट्रीय विक्रम धारक सिद्धांत थिंगल्याने 110 मीटर अडथळा शर्यतीत 13.97 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू अडथळे धावणारा धावपटू ग्रेसन अमलदासने पाहुण्यांच्या शर्यतीत ज्युनियर पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत 13.91 सेकंद वेळेसह विजय मिळवला.

हेही वाचा - Cricketer Cheteshwar Pujara : भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पुजाराचे मोठे वक्तव्य; आयपीएलमध्ये खरेदी...!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.