ETV Bharat / sports

सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने त्याच्या करियरमधील टर्निंग पाँईंट सांगितला - टोकियो ऑलिम्पिक

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याच्या करियरमधील टर्निंग पाँईंट बद्दल सांगितलं. नीरज म्हणाला की, नॅशनल शिबिरात सहभागी होणे माझ्या करियरमधील सर्वात महत्वाचा टर्निंग पाँईट ठरला.

Joining national camp was turning point in my career: Neeraj Chopra
सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने त्याच्या करियरमधील टर्निंग पाँईंट सांगितला
author img

By

Published : Aug 10, 2021, 3:59 PM IST

नवी दिल्ली - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याच्या करियरमधील टर्निंग पाँईंट बद्दल सांगितलं. नीरज म्हणाला की, नॅशनल शिबिरात सहभागी होणे माझ्या करियरमधील सर्वात महत्वाचा टर्निंग पाँईट ठरला. नीरज चोप्रा 7 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत ही कामगिरी केली.

भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात नीरज चोप्रा म्हणाला, 2015-16 च्या नॅशनल स्पर्धेनंतर माझी निवड नॅशनल शिबिरासाठी झाली. हा माझ्या क्रीडा करियरमधील निर्णायक क्षण ठरला. शिबिरात आम्हाला चांगल्या सुविधा मिळाल्या.

मी माझ्या वरिष्ठ अॅथलिटना पाहून प्रेरित झालो होतो. देशाच्या सर्वश्रेष्ठ अॅथलिटमध्ये प्रशिक्षण घेण्याची एक वेगळी भावना होती. मी फक्त कठोर परिश्रम घेतलं आणि परिणाम तुमच्यासमोर असल्याचे देखील नीरज म्हणाला.

प्रत्येक अॅथलिटचे स्वप्न असते की, पदक जिंकावं. मी जेव्हा सुवर्ण पदक जिंकलो. तेव्हा मला विश्वास वाटत नव्हता. कारण स्पर्धा कठिण होती. स्पर्धेक देखील तगडे होते. पण मी चांगलं प्रदर्शन करत सुवर्ण पदक जिंकलं, असेही नीरजने सांगितलं.

नीरजने एएफआय साई, टॉप्स, भारतीय सेना आणि क्रीडा प्रायोजकांचे आभार मानले. याशिवाय त्याने चाहत्याचे देखील आभार मानले. दरम्यान, नीरज चोप्रा काल सोमवारी भारतात परतला. इंदिरा गांधी विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणू साजरा करण्यात येणार

हेही वाचा - Etv Bharat शी बजरंग पुनियाची खास बातचित; काय म्हणाला कास्य पदक विजेता जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.