नवी दिल्ली - आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कोरोनाविरूद्ध लढाईसाठी केंद्र आणि हरियाणा राज्य मदत निधीसाठी तीन लाख रुपये दिले आहेत. मी पीएम रिलीफ फंडात दोन लाख आणि हरियाणा कोविड रिलीफ फंडामध्ये एक लाख रुपये दान दिले आहेत. मला आशा आहे की याक्षणी आपण देशाला मदत करू, असे नीरजने ट्विट करत म्हटले आहे.
तुर्कीहून परतल्यानंतर नीरज सध्या पटियाला येथील नॅशनल स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये एकांतवासात आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरज पदाकाचा प्रमुख दावेदार मानला जात होता. मात्र, कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेविषयीच्या या निर्णयाचे नीरजने स्वागत केले आहे.