मुंबई - प्रो कबड्डीत आज (शनिवार) दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्ससमोर बंगाल वॉरिअर्सचे कडवे आव्हान होते. परंतु, अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात जयपूरने अखेरच्या क्षणी चांगला खेळ करताना २७-२५ अशा गुणफरकाने सामना जिंकला. जयपूरकडून संदीप धुलने बचावात ८ गुणांची कमाई करत विजयात मोठी भूमिका बजावली.
-
A commanding lead, an inspired comeback and a last-raid finish - #JAIvKOL had it all! 😍
— ProKabaddi (@ProKabaddi) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Join us tomorrow for more action from #VIVOProKabaddi Season 7 on Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/mpHL7Ywd3E
">A commanding lead, an inspired comeback and a last-raid finish - #JAIvKOL had it all! 😍
— ProKabaddi (@ProKabaddi) July 27, 2019
Join us tomorrow for more action from #VIVOProKabaddi Season 7 on Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/mpHL7Ywd3EA commanding lead, an inspired comeback and a last-raid finish - #JAIvKOL had it all! 😍
— ProKabaddi (@ProKabaddi) July 27, 2019
Join us tomorrow for more action from #VIVOProKabaddi Season 7 on Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/mpHL7Ywd3E
बंगाल वॉरिअर्सने पहिल्या सत्राच्या सुरुवातीला चांगला खेळ करताना जयपूरवर दबाव निर्माण करत आघाडी घेतली होती. परंतु, जयपूरने पुनरागमन करत बंगालची आघाडी कमी केली. पहिले सत्र संपल्यानंतर बंगालकडे १४-१० अशी ४ गुणांची आघाडी होती. दुसऱ्या सत्रात जयपूरने सामना संपायला अवघी ३ मिनिटे शिल्लक असताना बंगालची ४ गुणांची आघाडी मोडीत काढली. जयपूरने सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला बंगालवर लोन चढवताना १ गुणाची आघाडी घेतली. कर्णधार दीपक हुडाने शेवटच्या मिनिटाला बलदेव सिंगला बाद करत जयपूरचा २७-२५ असा विजय निश्चित केला. यासोबत दीपक हुडाने प्रो कबड्डीत ८०० गुणांचा टप्पाही पार केला.
जयपूरकडून चढाईत दीपक हुडाने ६ गुण आणि दीपक नरवालने ४ गुणांची कमाई केली. बचावात एकट्या संदीप धुलने ८ गुण घेतले. तर, त्याला अमित हुडा २ गुण घेत चांगली साथ दिली. बंगालकडून चढाईत के. प्रपंजनने ७ गुण, कर्णधार मनिंदर सिंगने ६ गुण घेतले तर, बलदेव सिंगने बचावात ६ गुणांची कमाई करत संघाला शेवटपर्यंत सामन्यात आघाडीवर ठेवले होते. परंतु, अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे बंगालला पराभवाला सामोरे जावे लागले.