ETV Bharat / sports

कोरोना इफेक्ट : दिल्लीमध्ये होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द - विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरूवातील १५ ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची ही स्पर्धा ५ ते १३ मे दरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जून दरम्यान होणार होती. पण, सद्य परिस्थिती पाहता एनआरएआयने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ISSF Shooting World Cup In Delhi Cancelled Due To Coronavirus Pandemic
कोरोना इफेक्ट : दिल्लीमध्ये होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द
author img

By

Published : Apr 7, 2020, 10:50 AM IST

दिल्ली - जगभरासह देशात कोरोनाच्या संसंर्गामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे राजधानी नवी दिल्ली येथे मे आणि जून महिन्यात दोन टप्प्यात होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली. सर्वाच्या आरोग्याचे हित जपण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरूवातील १५ ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची ही स्पर्धा ५ ते १३ मे दरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जून दरम्यान होणार होती. पण, सद्य परिस्थिती पाहता एनआरएआयने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सध्याची परिस्थिती पाहता, जागतिक नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) आणि भारतीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याआधी आयएसएसएफने बाकू, अझरबैजान येथे २२ जून ते ३ जुलैदरम्यान होणारी विश्वचषक स्पर्धाही रद्द केली आहे.

हेही वाचा - खुशखबर!..7 एप्रिलपासून होणार क्रिकेट सुरू..भारत सरकारचा निर्णय

हेही वाचा - टी-२० विश्वकरंडक नियोजित वेळेत होणार, यजमान ऑस्ट्रेलियाचा विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.