नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलाव 2023 ( IPL Mini Auction 2023 ) 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावात 405 खेळाडूंची ( Allah Mohammad Ghazanfar ) बोली लागणार आहे. लिलावासाठी जवळपास ( Allah Mohammad Ghaznafar is Right Arm Off Spinner ) सर्व संघ आपापल्या रणनीतीवर काम करीत ( Ghaznafar Base Price in Auction of Rs 20 Lakh ) आहेत. या लिलावात अनेक युवा खेळाडू सहभागी होणार असून, त्यावर संघाच्या नजरा ( Amit Mishra Oldest Player in IPL Auction ) असतील. पण, या बातमीत आम्ही तुम्हाला या IPL लिलावात सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण यावरील माहिती देणार रिपोर्ट पाहा.
जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी इंग्लंडचा बेन स्टोक्स : या लिलावात जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन यांच्यावर सर्वांचे लक्ष असले तरी सर्वांच्या नजरा 15 वर्षीय अल्लाह मोहम्मद गझनफरवर असणार आहे. अल्लाह गझनफर हा या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू आहे. अफगाणिस्तानचा हा खेळाडू इतका तरुण आहे की त्याचा जन्म आयपीएलची सुरुवात होण्याच्या दोनच महिने आधी झाला होता. म्हणजेच 13 सप्टेंबर 2007 ला जेव्हा IPL लाँच झाले तेव्हा 15 जुलै 2007 ला जन्मलेले हे मूल फक्त 2 महिन्यांचे होते.
अल्लाह मोहम्मद गझनफर सर्वात तरुण ऑफ स्पिनर : अल्लाह मोहम्मद गझनफर हा उजवा हाताचा ऑफ स्पिनर आहे. तो 6 फूट 2 इंच उंचीचा खेळाडू आहे. लिलावात त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे. अल्लाह मोहम्मद गझनफर पहिल्यांदा प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने या वर्षीच्या शापागिझा टी-२० क्रिकेट लीगमध्ये 15 धावांत 4 विकेट घेतल्या. या वर्षी ऑगस्टमध्ये हिंदुकुश स्टार्सविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम प्रयास बर्मनच्या नावावर आहे. जो 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून वयाच्या 16 वर्षे 157 दिवसांमध्ये खेळला होता.
IPL 2023 च्या लिलावात अमित मिश्रा हा सर्वात वयस्कर खेळाडू : IPL 2023 च्या मिनी लिलावात अमित मिश्रा हा सर्वात वयस्कर खेळाडू असेल. आयपीएल 2022 पूर्वी अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राला दिल्ली कॅपिटल्सने सोडले होते. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यामध्ये रस दाखवला नाही आणि तो विकला गेला नाही. ४० वर्षीय अमित मिश्रा हा अतिशय अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय त्याने सर्वाधिक तीन वेळा हॅटट्रिक घेतली आहे, अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे. अमित मिश्राच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत 154 सामन्यात 166 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्यांचा इकॉनॉमी रेट ७.३५ आहे.