ETV Bharat / sports

Sachin Tendulkar Praised Cameron Green: कॅमेरून ग्रीनने आपल्यावर अहंकाराचे वर्चस्व गाजवू दिले नाही- सचिन तेंडुलकर - मुंबई इंडियन्सचा फलंदाज कॅमरून ग्रीन

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचा फलंदाज कॅमरून ग्रीनचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, कॅमेरूनने आपल्या अहंकाराला आपल्या कारकिर्दीत अडथळा बनू दिला नाही.

Sachin Tendulkar On Cameron Green
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
author img

By

Published : Apr 20, 2023, 1:22 PM IST

नई दिल्ली : मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या शानदार फलंदाजीचे कौतुक केले आहे. या सामन्यात कॅमेरूनने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याची फलंदाजी पाहून सचिनने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, कॅमेरून यांनी त्यांचा अहंकार त्यांच्या मार्गात येऊ दिला नाही. त्याच्या प्रवासाची सुरुवात दमदार झाली होती.

कॅमेरून ग्रीनची आयपीएलमध्ये कामगिरी : सचिन तेंडुलकरने सांगितले की, कॅमेरून ग्रीनची आयपीएलमध्ये चांगली सुरुवात झाली नाही. त्याने पहिल्या चार सामन्यात केवळ 5, 12, नाबाद 17 आणि 1 धावा केल्या. १८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. मुंबई इंडियन्सने या सामन्यात 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. त्याचवेळी लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैद्राबादचा डाव 19.5 षटकांत 178 धावा करून सर्व बाद झाले.

सामनावीराचा पुरस्कार : अहंकाराबद्दल बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, अहंकार ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करते. पण कॅमेरून ग्रीनने आपल्यावर अहंकाराचे वर्चस्व गाजवू दिले नाही. मुंबई इंडियन्सच्या हितासाठी ग्रीनने योग्य दिशा निवडली. तो खराब शॉटही खेळू शकला असता आणि कॅमेरून बाद झाला असता तर आपल्याला 192 धावांपर्यंत मजल मारता आली नसती. त्याच्या या प्रयत्नाचे कौतुक करायला हवे. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रीनने गोलंदाजीतही हात दाखवला आणि एडन मार्करामची विकेट घेतली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकरने हैदराबादविरुद्ध आयपीएल सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्जुनने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी शेवटचे षटक टाकले होते. अर्जुनने त्याची पहिली आयपीएल विकेट घेऊन 14 धावांनी मुंबईला विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचा : Sachin Tendulkar Fan: सचिनप्रेमी गोळा विक्रेत्याने राज्याच्या भावी मुख्यमंत्री पदासाठी सुरू केली जनमोहीम; वाचा 'हा' खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.