मुंबई - भारतीय महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला हिने ५० किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. जागतिक ऑलिम्पिक कुस्ती पात्रता स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकचे तिकिट मिळवणारी सीमा ही दुसरी भारतीय ठरली आहे.
ऑलिम्पिक कुस्ती पात्रता स्पर्धेत सीमाने युरोपीय चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेती पोलंडची कुस्तीपटू अन्न लुकासियाक हिला २-१ पराभूत करत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (५३ किलो), अंशु मलिक (५७ किलो) आणि सोनम मलिक (६२ किलो) यांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.
दरम्यान, आतापर्यंत कुस्ती क्रीडा प्रकारातून आठ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. सीमा बिस्ला (५० किलो), विनेश फोगाट (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो), रवि कुमार दाहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि सुमित मलिक (१२५ किलो) हे ते खेळाडू आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या लेकीने ८०९१ मीटर उंच अन्नपूर्णा शिखर केले सर, ठरली पहिली भारतीय महिला
हेही वाचा - सुवर्ण पदक विजेती बॉक्सर अल्फिया पठाणचे नागपूर नगरीत स्वागत