नवी दिल्ली - भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पूनियाला भारतीय कुस्ती महासंघाने यंदाच्या खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. तसेच पुरस्कार निवड समितीनेही बजरंगचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवले आहे. त्यामुळे त्याला यंदा हा पुरस्कार मिळेल, हे निश्चित झाले आहे.
तबिलिसी ग्रां. पी स्पर्धेमध्ये बजरंग पुनिया याने सुवर्णपदक जिंकले होते. बजरंग पूनिया याने पुरुषाच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला २-० ने मात दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे, बजरंगने मागील वर्षीही ताबिलसी ग्रांपीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
शिवाय, बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदके आहेत. गतवर्षी त्याने सुवर्णपदक पटकावले होते. तर, २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.