ETV Bharat / sports

रियो ऑलिम्पिकमधील अपयश धुवून काढण्यासाठी भारतीय नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये उतरतील - सौरभ चौधरी

रियो ऑलिम्पिकमधील निराशजनक कामगिरीनंतर आपल्या कामगिरीत दिवसागणिक सुधारणा करत असलेले भारतीय नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने उतरतील.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/23-July-2021/12549957_sar.jpg
रियो ऑलिम्पिकमधील अपयश धुवून काढण्यासाठी भारतीय नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये उतरतील
author img

By

Published : Jul 23, 2021, 5:08 PM IST

टोकियो - रियो ऑलिम्पिकमधील निराशजनक कामगिरीनंतर आपल्या कामगिरीत दिवसागणिक सुधारणा करत असलेले भारतीय नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने उतरतील. यंदा भारतीय नेमबाज संघातील खेळाडूंकडून एक-दोन नव्हे तर चार पदकाची आशा व्यक्त केली जात आहे.

भारताचे 15 नेमबाज टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. सर्वच्या सर्व नेमबाज पदक जिंकण्यात सक्षम आहेत. काही जणांना तर पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. यातील सौरभ चौधरीचा सामना ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या खेळाडूंशी होणार आहे. पुरूष 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा भारताचे प्रतिनिधित्व करतील.

महिला नेमबाजांमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वालारिवन यांच्यावर भारताच्या आशा आहेत.

आयएसएसएफ विश्व कपमध्ये तीन सुवर्णपदक जिंकलेली अपूर्वी चंदेला हिला टोकियो ऑलिम्पिकआधी कोरोनाची लागण झाली होती. तिचे हे दुसरे ऑलिम्पिक असून याआधी ती रियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरून देखील पायाला दुखापत झाल्याने खेळू शकली नव्हती.

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली इलावेनिल देशाची सर्वश्रेष्ठ रायफल नेमबाज आहे. तिला ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग मागील सात वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे.

दुसऱ्या दिवशी भारताची मनु भाकेर आणि यशस्वीनी सिंह देशवाल 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात उतरेल. पुरूष गटात 10 मीटर एअर रायफलमध्ये दिव्यांश सिंह पवार आणि दीपक कुमार यांच्यावर भारतीयांच्या नजरा आहेत.

नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात राही सरनोबत, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, अंजुम मुद्रिल, तेजस्विनी सावंत, संजीव राजपूत आणि मेराज अहमद खान आणि अंगद वीर सिंह बाजवा यांचे आव्हान आहे.

राही सरनोबतने नुकतीच पार पडलेल्या आयएसएसएफ विश्व कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तर 18 वर्षीय दिव्यांश सिंह पवार याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 सुवर्णपदक जिंकली आहेत.

हेही वाचा - Tokyo Olympic : महाराष्ट्राचा प्रविण जाधव 31व्या स्थानावर; अतनुने मिळवले 35वे स्थान

हेही वाचा - Tokyo Olympics: पुरुष तिरंदाजांच्या सुमार कामगिरीचा भारताला फटका; मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये होणार तोटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.