मुंबई - क्रोएशियाच्या ओसीजेकमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची मराठमोळी नेमबाज राही सरनोबत हिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. राहीने २५ मीटर एअर पिस्तल प्रकारात हे सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत राही ४० पैकी ३९ पाईंट्स घेण्यात यशस्वी ठरली.
-
🚨 GOLD MEDAL ALERT 🚨
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) June 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rahi Sarnobat has won Gold Medal at #Issfworldcup Croatia 🇭🇷 in 25m Pistol Women@SarnobatRahi scored 39, just one shy of WR
🥇 🇮🇳
🥈 🇫🇷
🥉 🇷🇺
Manu finished 7th@RaninderSingh pic.twitter.com/b1IWWI0Wde
">🚨 GOLD MEDAL ALERT 🚨
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) June 28, 2021
Rahi Sarnobat has won Gold Medal at #Issfworldcup Croatia 🇭🇷 in 25m Pistol Women@SarnobatRahi scored 39, just one shy of WR
🥇 🇮🇳
🥈 🇫🇷
🥉 🇷🇺
Manu finished 7th@RaninderSingh pic.twitter.com/b1IWWI0Wde🚨 GOLD MEDAL ALERT 🚨
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) June 28, 2021
Rahi Sarnobat has won Gold Medal at #Issfworldcup Croatia 🇭🇷 in 25m Pistol Women@SarnobatRahi scored 39, just one shy of WR
🥇 🇮🇳
🥈 🇫🇷
🥉 🇷🇺
Manu finished 7th@RaninderSingh pic.twitter.com/b1IWWI0Wde
३० वर्षीय राहीने एकूण ५९१ पाईंट्ससह दुसरे स्थान काबिज केले होते. परंतु अंतिम फेरीत तिने शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिसरी, चौथी, आणि सहाव्या सिरिजमध्ये तिने पाईंट्स घेत सुवर्णपदक जिंकले. फ्रान्सची मथिल्डे लामोले रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. अंतिम फेरीत तिने ३१ पाईंट्स घेतले. रशियाची विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली.
भारताची मनू भाकर हिला अंतिम फेरीत खास कामगिरी करता आली नाही. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे नेमबाजी विश्वचषकामध्ये १० मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात सौरभ चौधरी आणि मनू भाकर या भारतीय जोडीने रौप्य पदक जिंकले आहे.
भारताने या स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकले आहे. आज राहीने सुवर्णपदक जिंकले. भारताचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे. दरम्यान, राहीच्या या सुवर्ण कामगिरीनंतर तिच्यावर सोशल मीडियावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. टोकियो ऑलिम्पिकला जाण्याआधी भारतीय नेमबाजांसाठी ही अखेरची स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून देशाला पदकाच्या आपेक्षा आहेत.
हेही वाचा - ICC T20 WC : टी-२० विश्वकरंडकाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा
हेही वाचा - Ind vs SL : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना, पाहा फोटो