नवी दिल्ली - भारतीय ग्रँडमास्टर पेंटाला हरिकृष्णा मॅग्नस कार्लसन टूरमध्ये सहभागी होणार आहेत. दीड लाख डॉलर्स बक्षीस रक्कम असणारी ही स्पर्धा या महिन्याच्या शेवटी होईल. हरिकृष्णा यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. जागतिक क्रमवारीत हरिकृष्णा 26 व्या स्थानी आहेत.
20 जूनपासून सुरू होणार्या ऑनलाईन स्पर्धेसाठी विश्वविजेता कार्लसन 12 खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी असेल. फेबियानो कॅरुआना, डिंग लीरन, हिकारू नाकामुरा, इयान नेपोमॅनाची, डॅनिल दुबॉव, मॅक्सिम वॅचिअर-लाग्रॅव्ह, अनीश गिरी, अलेक्झांडर ग्रिशचुक, तैमूर रॅडॅझावोव्ह आणि व्लादिस्लाव आर्टेमिएव्ह हे बुद्धिबळपटूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
बुद्धिबळमधील दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. मला चांगली कामगिरी करण्याची आशा आहे, असे हरिकृष्णा म्हणाले. शुक्रवारी सुरू होणार्या शारजाह ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेतही ते भाग घेत आहेत.