अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील चौथा सामना ( Fourth Match of Five Test Series Between India and Australia ) सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-२ ने पिछाडीवर ( India Trailed 1-2 in Five Test series ) आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे आवश्यक ( India to Win Today Encounter in Order to Equalize ) आहे. भारत हा सामना हरला, तर मालिका गमवावी लागेल. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली संघाला सामना जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावावी लागेल जेणेकरून मालिका रोमांचक करता येईल.
तिसरा सामना भारताने जिंकला : 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4-3 असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने पहिला (12व्या मिनिटाला), अभिषेकने दुसरा (47व्या मिनिटाला), शमशेर सिंगने तिसरा (57व्या मिनिटाला) आणि आकाशदीपने (60व्या मिनिटाला) चौथा गोल केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या जॅक वेल्च (25व्या मिनिटाला), अरान जालेव्स्की (32वे मिनिट) आणि नॅथन इफ्राम्स (59व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
भारताने दोन सामने गमावले आहेत : 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) 5-4 असा पराभव केला. त्या सामन्यात आकाशदीपने तीन गोल करीत हॅट्ट्रिक केली होती. त्याचवेळी हरमनप्रीत सिंगने गोल केला. भारताकडून आकाशदीप सिंगने (१०वा, २७वा, ५९वा) तीन गोल केले, तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने (३१वे) पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) 7-4 असा पराभव केला.
सामन्याचे वेळापत्रक : 3 डिसेंबर, शनिवार सकाळी 11:00 वा, 4 डिसेंबर, रविवार सकाळी 11:00 वा,
टीम इंडिया : गोलरक्षक : पीआर श्रीजेश, कृष्णा बी पाठक, बचावपटू : जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीप खेस, वरुण कुमार मिडफिल्डर : सुमित, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, मोहम्मद राहील मौसीन, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग फॉरवर्ड : मनदीप सिंग, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग
येथे पाहा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी कसोटी मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जात आहे. याशिवाय Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.