ETV Bharat / sports

India vs Australia 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया चेपॉक स्टेडियमवर आज आमनेसामने; पार पडणार तिसरा एकदिवसीय सामना - चेपॉक स्टेडियम

भारत आणि ऑस्ट्रेलिया चेपॉक स्टेडियमवर आज आमनेसामने असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

India vs Australia 3rd ODI
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना
author img

By

Published : Mar 22, 2023, 8:58 AM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघ आणि भारतीय संघ यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने झाले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा तिसरा एकदिवसीय सामना आज पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला होता. दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे झाला होता. त्यात कांगारू संघाने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता. आता या निर्णायक सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो. आज दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.

कोणता संघ कोणावर मात करेल? या वर्षात अद्याप भारतीय क्रिकेट संघाने एकही आंतरराष्ट्रीय मालिका गमावलेली नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अखेर कोणता संघ कोणावर मात करेल? या मैदानावर दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. आता कोण जिंकणार, हे सामन्यानंतरच कळेल. ही एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्याने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासाची सुरुवात झाली. या मैदानावर ९ ऑक्टोबर १९८७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाचा 1 धावांनी पराभव झाला. हा सामना खास असणार आहे.

एकदिवसीय सामना : चेपॉक मैदानावर एकदिवसीय सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. असे मानले जाते की, या मैदानावर प्रथम फलंदाजी करणारा संघ एकदिवसीय सामना जिंकतो. मागील आकडेवारीबद्दल बोलायचे तर, येथे खेळल्या गेलेल्या 22 एकदिवसीय सामन्यांपैकी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बहुतेक सामने जिंकले आहेत. या मैदानावरील एकदिवसीय क्रिकेटच्या 22 सामन्यांपैकी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संघाने 13 सामने जिंकले. आणि 2019 मध्ये उलट घडले. भारताविरुद्ध नंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला होता. एकप्रकारे, असे देखील म्हणता येईल की तिसऱ्या वनडेमध्ये नाणेफेक देखील मोठी भूमिका बजावू शकते.

हेही वाचा : WPL 2023 RCB Vs MI : मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्सवर 4 विकेट राखून विजय; महिला आयपीएलमध्ये एमआय बनली नंबर 1 चा संघ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.