राउरकेला: हॉकी विश्वचषक 2018 ( Hockey World Cup 2018 ) च्या यशानंतर, ओडिशा आता भुवनेश्वर आणि राउरकेला येथे सलग दुसऱ्या हॉकी विश्वचषक 2023 चे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. भुवनेश्वरमधील विद्यमान कलिंगा हॉकी स्टेडियमची आसनक्षमता 15,000 लोकांची आहे, परंतु राज्य राउरकेला येथे एक नवीन बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम ( Birsa Munda International Hockey Stadium ) बांधत आहे, ज्यामध्ये 20,000 लोक बसण्याची क्षमता असेल, ज्याला भारतातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमचा दर्जा मिळणार आहे.
राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, बिरसा मुंडा स्टेडियमचे बांधकाम अद्याप सुरू आहे आणि ते यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. "यानंतर, एफआयएच ( International Hockey Federation ) चे अधिकारी येथे तपासणीसाठी येतील आणि त्यानंतर विश्वचषकापूर्वी त्यास मान्यता देण्यासाठी चाचणी कार्यक्रम होईल," असे अधिकाऱ्याने सांगितले. स्वातंत्र्यसेनानी 'बिरसा मुंडा' ( Freedom Fighter Birsa Munda ) यांच्या नावावरुन या स्टेडियमला नाव देण्यात आले. हे स्टेडियम सर्व आधुनिक सुविधांसह हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राउरकेला येथील बिजू पटनायक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये ( Biju Patnaik Technological University Campus ) हे स्टेडियम 20 एकर जागेवर पसरले आहे. यामुळे हॉकीसाठी जागतिक स्टेडियम डिझाइनमध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित होईल. स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधा, चेंजिंग रूम, फिटनेस सेंटर आणि हायड्रोथेरपी पूलसह सराव मैदान असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. 100 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाने बांधण्यात येणारी स्वतंत्र गृहनिर्माण सुविधा असेल. ही सुविधा सामन्यादरम्यान खेळाडू, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी असेल.
सुंदरगड जिल्हा हा हॉकीसाठी ओळखला जातो आणि जिल्ह्यातील राउरकेला शहराने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जन्म दिला आहे. विशेषत: दिलीप तिर्की, लाजरस बार्ला. राउरकेलाचे हे स्टेडियम सुंदरगड जिल्ह्याची शान मानले जाईल, जे लहानपणापासून हॉकीपटू तयार करण्यास मदत करेल.
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमप्रमाणे, बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथील हॉकी पायाभूत सुविधांना चालना देईल आणि हॉकी चॅम्पियन्सचा मार्ग मोकळा करेल. या स्टेडियमची पायाभरणी मुख्यमंत्री नवीन पटनायक ( CM Naveen Patnaik ) यांच्या हस्ते फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आली होती आणि तेव्हापासून कोविड, चक्रीवादळ आणि उष्णतेच्या आव्हानांना न जुमानता, काम पूर्ण गतीने सुरू आहे. त्यामुळे हे स्टेडियम वेळेवर तयार होईल.
हेही वाचा - IPL 2022 RR vs DC : दिल्ली कॅपिटल्स समोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; मागील पराभवाचा बदला दिल्ली घेणार का?