रांची : कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना संध्याकाळी 7 वाजता खेळणार सुरू झाला. महेंद्रसिंग धोनीच्या होम टाऊनमध्ये होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे 177 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाल्याने वेगात धावा करण्याच्या नादात फलंदाज एका मागोमाग तंबूत परतले. वाॅशिंग्टन सुंदरने छान फलंदाजी करीत सामन्यात रंगत आणली. परंतु, 155 धावांपर्यंत टीम इंडिया पोहचली.
न्यूझीलंडचा डाव : फिनन अॅलेन आणि काॅन्वेने दमदार सुरुवात करीत न्यूझीलंड संघाच्या धावसंख्येला आकार दिला. न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करीत 176 धावसंख्या उभारली. ओपनर आलेल्या फिनन अॅलेनने 35 तर काॅन्वेने 52 धावा करीत जोरदार सुरुवात केली. डॅरेल मायकेलने 59 धावांची भक्कम खेळी करीत मोठी धावसंख्या उभारली.
-
That's that from Ranchi.
— BCCI (@BCCI) January 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New Zealand win the first T20I by 21 runs in Ranchi.#TeamIndia will look to bounce back in the second #INDvNZ T20I.@mastercardindia pic.twitter.com/Lg8zmzwYVH
">That's that from Ranchi.
— BCCI (@BCCI) January 27, 2023
New Zealand win the first T20I by 21 runs in Ranchi.#TeamIndia will look to bounce back in the second #INDvNZ T20I.@mastercardindia pic.twitter.com/Lg8zmzwYVHThat's that from Ranchi.
— BCCI (@BCCI) January 27, 2023
New Zealand win the first T20I by 21 runs in Ranchi.#TeamIndia will look to bounce back in the second #INDvNZ T20I.@mastercardindia pic.twitter.com/Lg8zmzwYVH
भारतीय संघाची घसरती फलंदाजी : भारतीय संघाची सुरुवातच अत्यंत खराब झाली. भारताच्या डावाची सुरुवात 11 धावांवर 3 गडी बाद करून झाली. भारतीय फलंदाज घसरत राहिली. वाॅशिंग्टन सुंदरने अत्यंत चुरशीची खेळी करीत एकहाती लढत दिली. त्याने 28 चेंडूत 50 धावांची मोठी खेळी केली. परंतु, एकामागोमाग खेळाडू बाद होत राहिले.
-
1ST T20I. New Zealand Won by 21 Run(s) https://t.co/gyRPMYVaCc #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1ST T20I. New Zealand Won by 21 Run(s) https://t.co/gyRPMYVaCc #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 27, 20231ST T20I. New Zealand Won by 21 Run(s) https://t.co/gyRPMYVaCc #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 27, 2023
गिल आणि किशन करणार डावाची सुरुवात : गिल आणि किशन करणार डावाची सुरुवात, असे कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, शुभमन गिलने गेल्या चार डावांमध्ये द्विशतकासह तीन शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलामीवीर शुभमन गिलला पृथ्वी शॉपेक्षा प्राधान्य दिले जाईल, असे पंड्याने गुरुवारी सांगितले. गिलवर संघाचा पूर्ण विश्वास आहे. कर्णधार म्हणाला, 'गिल आणि ईशान किशन डावाची सुरुवात करतील. शुभमनने चमकदार कामगिरी केली असून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
महेंद्रसिंह धोनीने घेतली टीम इंडियाची भेट : टीम इंडियासोबत माहीही दिसला. भारतीय संघ रांचीला पोहोचला असून, सराव करीत आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही संघातील खेळाडूंची भेट घेतली आहे. इशान किशननेही धोनीशी संवाद साधला आहे.
भारत-न्यूझीलंडदरम्यान झालेले सामने : दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 12 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी 9 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आणि एक सामना बरोबरीत सुटला. भारताने दोन सुपर ओव्हर सामनेही जिंकले आहेत. या आकडेवारीत भारतीय संघाचा वरचष्मा दिसत आहे. त्यांचा जुना विक्रम पाहता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध विजयाचा धडाका लावू शकतो.
पिच रिपोर्ट : पिच रिपोर्टर रांचीच्या मैदानात रॅचच्या औंसमुळे गोलंदाजांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे येथे प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. येथे झालेल्या 25 टी-20 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल त्याला प्रथम गोलंदाजी करायची आहे.
भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (क), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.