ETV Bharat / sports

Boxer Sagar Ahlawat : वृत्तपत्रातील एका लेखाने बॉक्सर सागर अहलावतचे कसे बदलले आयुष्य, घ्या जाणून

कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय तुकडीमध्ये समाविष्ट असलेला पुरुष बॉक्सर सागर अहलावतने ( Boxer Sagar Ahlawat ) त्याची कहाणी शेअर केली आहे. तो म्हणतो, मी अभ्यासात चांगला नव्हतो. माझ्याने अभ्यास होत नव्हता. म्हणूनच मी बारावीनंतर काहीतरी करायचं म्हणून शोधू लागलो.

Boxer Sagar Ahlawat
बॉक्सर सागर अहलावत
author img

By

Published : Jul 23, 2022, 6:59 PM IST

नवी दिल्ली: बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ( Commonwealth Games 2022 ) 14 बॉक्सर भारतीय बॉक्सिंग दलात पाठवले जात आहेत, ज्यांच्याकडून देशाला पदकांच्या मोठ्या आशा आहेत. हे सर्व खेळाडू बर्मिंगहॅम गेम्सपूर्वी तयारीत व्यस्त आहेत. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या या खेळाडूंपैकी अनेकांनी जागतिक पटलावर आपले नाव कोरले आहे. त्याचबरोबर काही खेळाडू पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहेत. यापैकी एक बॉक्सर म्हणजे सागर अहलावत ( Boxer Sagar Ahlawat ) आहे.

सागर अहलावत म्हणतो की, 2015 मध्ये फ्लॉइड मेवेदर जूनियर आणि मॅनी पॅकियाओ यांच्यातील शतकातील लढतीवरील वृत्तपत्रातील लेख वाचून त्यांचे आयुष्य बदलले. हा लेख वाचल्यानंतर सात वर्षांनंतर, 20 वर्षीय बॉक्सर बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या +92kg सुपर हेवीवेट स्पर्धेत ( Men's +92kg Super Heavyweight Tournament ) प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करत आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. सागरने पीटीआयला सांगितले की, मी अभ्यासात चांगला नव्हतो. माझ्याने अभ्यास होत नव्हता. म्हणून मी बारावीनंतर काहीतरी करायचं म्हणून शोधू लागलो.

वर्तमानपत्रातील एका लेखाने बदलले आयुष्य -

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागरचा खेळाशी काहीही संबंध नव्हता. पण एके दिवशी त्याने वर्तमानपत्रात मेवेदर आणि पॅकियाओ यांच्यातील प्रसिद्ध संघर्षाबद्दल पूर्ण पानाचा लेख वाचला. दोन महान मुष्टियोद्धा आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्याने वाचले तेव्हा त्याला काय करायचे आहे हे स्पष्ट झाले. सागर म्हणाला, माझ्या कुटुंबातील कोणीही खेळात नाही. मला बॉक्सिंगबद्दल थोडेसे माहित होते, परंतु वर्तमानपत्रात मेवेदर आणि पॅकियाओबद्दल वाचून मला प्रेरणा मिळाली ( Reading about Mayweather and Pacquiao inspired ).

तो म्हणाला, मी 2017 मध्ये बॉक्सिंगला सुरुवात केली आणि जवाहर बाग स्टेडियममध्ये प्रशिक्षण सुरू केले. पण त्याच्या शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी त्याला अनेक वेळा प्रशिक्षण सोडावे लागले. दोन वर्षांनंतर त्याने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्याने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सलग जेतेपद पटकावले ( Consecutive titles Khelo India University Games ).

Super heavyweight boxer Sagar Ahlawat
सुपर हेवीवेट बॉक्सर सागर अहलावत

हा सुपर हेवीवेट बॉक्सर ( Super heavyweight boxer Sagar Ahlawat ) म्हणाला, मी 2019 मधील माझ्या पहिल्या युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भाग घेतला, ज्यामध्ये मला सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर 2020 मध्ये आणि पुढच्या वर्षीही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मी सुवर्णपदक जिंकले.

पदार्पणातच 2021 च्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकानंतर त्याचा पटियाला येथील राष्ट्रीय शिबिरात समावेश करण्यात आला. कॉमनवेल्थ गेम्सच्या निवड चाचणीतही ( Commonwealth Games Selection Test ) त्याने छाप पाडली. टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीतील सतीश कुमारला पराभूत केल्यानंतर, सागरने गतविजेत्या राष्ट्रीय विजेत्या नरेंद्रचा पराभव करून बर्मिंघमचे तिकीट बुक केले, ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सागर म्हणाला, ही माझी पहिलीच स्पर्धा असल्याने मी अजिबात नर्व्हस नाही. कारण मी खूप चांगले प्रशिक्षण घेतले आहे. मला चांगली लढत करायची आहे.

हेही वाचा - Lovlina Borgohain Statement : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना हलक्यात घेणे शहाणपणाचे नाही बॉक्सर लव्हलिना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.