नोवे मेस्टो(चेक प्रजासत्ताक)- भारताची वेगवान धावपटू हिमा दास हिने सुवर्णपदक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. तिने शनिवारी चेक प्रजासत्ताक येथील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां प्री स्पर्धेत 400 मीटर अंतर 52.09 सेंकदमध्ये पार करत सुवर्णपदक जिंकले आहे. हिमाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली. हिमा दासने मागील 19 दिवसात विविध स्पर्धात पाच सुवर्णपदके जिंकली आहेत.
-
Finished 400m today on the top here in Czech Republic today 🏃♀️ pic.twitter.com/1gwnXw5hN4
— Hima MON JAI (@HimaDas8) July 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Finished 400m today on the top here in Czech Republic today 🏃♀️ pic.twitter.com/1gwnXw5hN4
— Hima MON JAI (@HimaDas8) July 20, 2019Finished 400m today on the top here in Czech Republic today 🏃♀️ pic.twitter.com/1gwnXw5hN4
— Hima MON JAI (@HimaDas8) July 20, 2019
हिमाचे 2 जुलैपासूनचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. युरोपच्या पोलंडमधील पॉझनन अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये 2 जुलै रोजी तिने पहिल्यांदा 200 मीटर स्पर्धा जिंकली. हे अंतर तिने 23.65 सेकंदात पार केले. या वर्षातील हेमाची ही पहिलीच स्पर्धा होती.
त्यानंतर तिने 7 जुलै रोजी पोलंडमध्येच झालेल्या कुंटो अॅथेलेटिक्स मीटमध्ये 23.97 सेकंदामध्ये 200 मीटरची स्पर्धा जिंकत दुसरे सुवर्णपदक मिळवले.
13 जुलै रोजी तिने चेक प्रजासत्ताकमधील क्लाडनो अॅथेलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरची स्पर्धा जिंकत तिसरे सुवर्ण पदक मिळवले. हे अंतर तिने 23.43 सेंकदात गाठले. यानंतर चेक प्रजासत्ताकमधेच झालेल्या टॅबर अॅथेलेटिक्स मीटमध्ये बुधवारी तिने चौथे सुवर्णपदक जिंकले होते.
भारताची वेगवान धावपटू आणि 'ढिंग एक्सप्रेस' अशी ओळख बनवलेल्या हिमा दासने मागील 20 दिवसांत तब्बल 5 सुवर्णपदके नावावर केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी करणाऱ्या हिमाने अत्यंत खडतर परिश्रम घेत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवले. या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून हिमा दासचे अभिनंदन केले.
नुकताच ब्रम्हपुत्रा नदीला पूर आल्याने आसाममधील ३० जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या संकटात सापडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी हिमाने आपला अर्धा पगार देण्याचे जाहीर केले. तिने मदतीची रक्कम मुख्यमंत्री मदत फंडामध्ये जमा केली आहे. शिवाय, मोठ्या कंपन्या तसेच नागरिकांना आसामला मदत करा, असे आवाहनही हिमाने केले आहे.