ETV Bharat / sports

हिमा दासची 'सुवर्ण' कामगिरी; 11 दिवसांत 3 सुवर्णपदकांना गवसणी - proud

भारताची प्रतिभावान धावपटू हिमा दासने मागील 11 दिवसांत तिसऱ्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हिमाने झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्वांदो स्मृती अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

हिमा दासची 'सुवर्ण' कामगिरी; 11 दिवसांत 3 सुवर्णपदकांना गवसणी
author img

By

Published : Jul 14, 2019, 12:01 PM IST

झेक प्रजासत्ताक- भारताची प्रतिभावान धावपटू हिमा दासने मागील 11 दिवसांत तिसऱ्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हिमाने झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्वांदो स्मृती अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमाने 200 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. तिने यावेळी 23.65 सेंकदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने 23.97 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले होते. रविवारी क्वांदो स्मृती अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत 23.43 सेकंदाची वेळ नोंदवत तिने आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

हिमाने गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिने सातत्याने आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे.

आसाममधील एका गरीब शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. परिस्थितीवर मात करत हिमाने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे.

Intro:Body:

हिमा दासची 'सुवर्ण' कामगिरी; 11 दिवसांत 3 सुवर्णपदकांना गवसणी

झेक प्रजासत्ताक- भारताची प्रतिभावान धावपटू हिमा दासने मागील 11 दिवसांत तिसऱ्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.  हिमाने झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्वांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमाने 200 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. तिने यावेळी 23.65 सेंकदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्स  स्पर्धेत तिने 23.97 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले होते. रविवानी क्वांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने 23.43 सेकंदाची वेळ नोंदवत तिने आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

हिमानं गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिने सातत्याने आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे.

आसाममधील एका गरीब शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. परिस्थितीवर मात करत हिमाने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.