ETV Bharat / sports

U२० फेडरेशन कप : यशवीर सिंहने मोडला नीरज चोप्राचा विक्रम - यशवीर सिंह न्यूज

हरियाणाचा भालाफेकपटू यशवीर सिंहने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. १८ व्या फेडरेशन ज्यूनियर कप स्पर्धेत २० वर्षाखालील गटात यशवीरने सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम नोंदवला आहे. यशवीरने ७८.६८ मीटर लांब भाला फेकला.

haryanas yashvir singh breaks neeraj chopras u20 fedcup javelin throw record
U20 फेडरेशन कप : यशवीर सिंहने मोडला नीरज चोप्राचा विक्रम
author img

By

Published : Jan 26, 2021, 12:42 PM IST

भोपाळ - कोरोना महामारीमुळे कालांतराने सुरूवात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरिल ‌अ‌ॅथलॅटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या दिवशी अनेक विक्रमाची नोंद झाली. यात हरियाणाचा भालाफेकपटू यशवीर सिंहने नवा विक्रम प्रस्तापित केला. तर धावपटू सुनिल दायर (मध्य प्रदेश) आणि अंकिता (उत्तराखंड) यांनी देखील शानदार कामगिरी केली.

हरियाणाचा भालाफेकपटू यशवीर सिंहने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. १८ व्या फेडरेशन ज्यूनियर कप स्पर्धेत २० वर्षाखालील गटात यशवीरने सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम नोंदवला आहे. यशवीरने ७८.६८ मीटर लांब भाला फेकला. यासह त्याने नीरज चोप्रा याचा ७६.९१ मीटरचा विक्रम मोडीत काढला. नीरजने २०१५ साली हैदराबादमध्ये हा विक्रम केला होता. कोरोना महामारीनंतर प्रथमच क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली आहे. यात १८ वी फेडरेशन ज्यूनियर कप स्पर्धेला देखील सुरूवात झाली असून यात यशवीरने नवा विक्रम नोंदवला.

अंकिताने ५ हजार मीटर धावण्याची स्पर्धा १६ मिनिटे ३७.९० सेंकदात पूर्ण केली. तिने सुमन राठीचा विक्रम मोडला. सुमनने २०१८ साली कोईबतूरमध्ये ५ हजार मीटरचे अंतर १७ मिनिटे ०२.६७ सेकंदात पूर्ण केले होते.

दक्षिण आशियाई ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई केलेला दावर याने १५०० मीटरचे अंतर ३ मिनिटे ४८.५४ सेकंदात पूर्ण केले. त्याने शशी भूषण सिंह (तीन मिनिटे ५१.१६ सेकंद) याचा विक्रम मोडीत काढला.

हेही वाचा - धक्कादायक...! चालू सामन्यात कबड्डीपटूचा झाला मृत्यू

हेही वाचा - २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल टी-१ चाचणीत गुरप्रीत प्रथम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.