मुंबई - अनुभवी भारतीय टेबल टेनिसपटू हरमीत देसाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला शानदार फॉर्म कायम राखत इंडोनेशिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकले. रविवारी झालेल्या या सामन्यात देसाईने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्याच अँथनी अमलराजचा ४-२ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.
-
Table Tennis: Harmeet Desai wins Indonesia Open Championship https://t.co/nBgGerYYtd pic.twitter.com/X8jZlcc6VW
— Daily News 60 (@60Daily) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Table Tennis: Harmeet Desai wins Indonesia Open Championship https://t.co/nBgGerYYtd pic.twitter.com/X8jZlcc6VW
— Daily News 60 (@60Daily) November 18, 2019Table Tennis: Harmeet Desai wins Indonesia Open Championship https://t.co/nBgGerYYtd pic.twitter.com/X8jZlcc6VW
— Daily News 60 (@60Daily) November 18, 2019
हेही वाचा - 'शमी हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज'
जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियन हरमीतचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. हरमीतने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या युटो किझिकोरीला ४-२ ने तर, उपांत्य सामन्यात हाँगकाँगच्या सियू हेंग लॅमचा ४-२ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
तर, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमरराजने पोर्तुगालच्या जोओ मॉन्टेरियाला ४-० आणि उपांत्य सामन्यात सेनेगलच्या इब्राहिम डियावचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.