बंगळुरू: भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने ( Vice Captain Harmanpreet Singh ) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धपूर्वी संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. तसेच या स्पर्धेच्या दृष्टीने कोणत्या विशिष्ट पैलूंवर सराव केला जात आहे, याबद्धल देखील माहिती दिली. एफआयएच प्रो लीगच्या अलीकडील कठीण सामन्यांमध्ये संघाची कामगिरी शानदार राहिली होती. या महिन्याच्या अखेरीस बर्मिंगहॅम येथे होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
हरमनप्रीत म्हणाला ( Harmanpreet Singh Statement Commonwealth Games 2022 ), आमची टीम चांगली कामगिरी करत आहे. आम्ही FIH हॉकी प्रो लीगमध्येही चांगले खेळलो. त्यामुळे गटात आत्मविश्वास उंचावला आहे. आम्ही सामने जिंकत राहू. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर नक्कीच प्रयत्न करू.
तो पुढे म्हणाला, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ( Commonwealth Games 2022 ) आमची तयारी चांगली सुरू आहे. आम्ही आमच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान आमच्या खेळाच्या विशिष्ट पैलूंवर काम करत आहोत. तसेच आम्ही FIH कडून शिकण्यावर भर देत आहोत. संघ सध्या ज्या विशिष्ट डिफेंडर पैलूंवर काम करत आहे, त्याबद्दल देखील त्याने सांगितले. 26 वर्षीय खेळाडूने असेही सांगितले की, प्रशिक्षणादरम्यान संघ सराव सामने खेळत आहे.
हेही वाचा - Singapore Open 2022 : सिंधूने चीनच्या हान युईचा पराभव करत उपांत्य फेरीत केला प्रवेश