मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ( India Australia T20I Series ) आगामी पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय महिला संघाची ( Indian Womens Team For Upcoming Five Match T20I Series ) घोषणा ( BCCI ) केली आहे. भारत 9 आणि 11 डिसेंबर रोजी D.Y. स्टेडियम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला आणि दुसरा T20 सामना ( Harmanpreet Kaur will Lead The 15 Member Team ) खेळणार आहे. दोन्ही संघ अनुक्रमे १४, १७ आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर उतरतील. हरमनप्रीत कौर १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल, तर स्टार फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार असेल.
या मालिकेसाठी खालीलप्रमाणे असणार भारतीय संघाची रचना : यास्तिका भाटिया आणि रिचा घोष या दोन यष्टीरक्षकांसह भारत या मालिकेत उतरणार आहे. फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडलाही संघात स्थान मिळाले आहे. पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. बीसीसीआयने सांगितले की, 'मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर आणि सिमरन बहादूर यांची नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे बाहेर असून तिच्या नावाचा निवडीसाठी विचार झालेला नाही. ICC महिला T20 विश्वचषक 2023 पूर्वी पाच सामन्यांची ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेसाठी योग्य संयोजन शोधण्याचा प्रयत्न करतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक) आणि हरलीन देओल.