नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विक्रम केला. 2022 चा टी-20 विश्वचषक संपल्यानंतर, पांड्याने आतापर्यंत 2023 मध्ये या फॉरमॅटमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे नेतृत्व केले. या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याने आपली फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली केली. त्याचा चांगला फॉर्म टी-20 मालिका जिंकण्यात मोलाचा ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत हार्दिकला 'प्लेयर ऑफ द सिरीज'चा किताब मिळाला.
-
For his overall show across the three games, Captain @hardikpandya7 bags the Player of the Series award.#INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/KGQ9vzjkWa
— BCCI (@BCCI) February 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For his overall show across the three games, Captain @hardikpandya7 bags the Player of the Series award.#INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/KGQ9vzjkWa
— BCCI (@BCCI) February 1, 2023For his overall show across the three games, Captain @hardikpandya7 bags the Player of the Series award.#INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/KGQ9vzjkWa
— BCCI (@BCCI) February 1, 2023
हार्दिक पांड्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची भर : हार्दिक पांड्याने या मालिकेत 66 धावा केल्या आणि एकूण 5 विकेट घेतल्या. त्याचबरोबर आता हार्दिकच्या नावावर आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. हार्दिक आता T20 फॉरमॅटमध्ये 4000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. आता तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक खेळाडूंमध्ये गणला जातो. IPL 2022 च्या मोसमात, हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला.
-
Hardik Pandya won the player of the series for his batting bowling & leadership. pic.twitter.com/sEGiXZUYqy
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hardik Pandya won the player of the series for his batting bowling & leadership. pic.twitter.com/sEGiXZUYqy
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2023Hardik Pandya won the player of the series for his batting bowling & leadership. pic.twitter.com/sEGiXZUYqy
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2023
हार्दिक पांड्या पहिला T20 सामना कधी खेळला : 2013 साली हार्दिक पंड्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला T20 सामना अहमदाबादमध्ये मुंबई विरुद्ध खेळला. तेव्हापासून, त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 223 सामने खेळले आहे. ज्यामध्ये हार्दिकने 29.42 च्या सरासरीने 4002 धावा केल्या. हार्दिकच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 15 अर्धशतकांची नोंद आहे. पंड्याची सर्वोच्च धावसंख्या ९१ धावांची आहे. सोबतच हार्दिकने टी-२० फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करून आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने आतापर्यंत 27.27 च्या सरासरीने एकूण 145 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एका सामन्यात 3 वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.