नवी दिल्ली - यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रीय फेडरेशनने गोल्फर राशिद खान, अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांच्या नावांची शिफारस केली आहे. जागतिक क्रमवारीत राशिद हा सर्वोच्च स्थानावर असेलला भारतीय गोल्फर आहे. तर, 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी अदिती सध्या अमेरिकेच्या लेडीज पीजीए टूरमध्ये खेळणारी देशातील एकमेव गोल्फर असून तिने लेडीज युरोपियन टूरमध्ये तीन वेळा विजतेपद पटकावले आहे.
दीक्षाने महिला दक्षिण आफ्रिकन ओपन स्पर्धेचे विजतेपद जिंकले होते. 2017 च्या डेफलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्या दीक्षाने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केली होती. मात्र ही पात्रता आता पुढे ढकलण्यात आली आहे.
भारतीय गोल्फ संघ असोसिएशनने (आयजीयू) या नावांची शिफारस केली आहे. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) आणि महिला गोल्फ असोसिएशन ऑफ इंडिया (डब्ल्यूजीएआय) शिफारस केलेली नावे आयजीयूकडे पाठवतात.
2010 च्या ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राशिदला कांस्यपदक गमवावे लागले. परंतू त्याने भारतीय संघाला रौप्यपदक जिंकून देण्यास मदत केली. आशियातील तो दहाव्या क्रमांकावरचा सर्वोत्कृष्ट क्रमवारी असलेला भारतीय गोल्फर आहे. जागतिक क्रमवारीतही तो 185 व्या क्रमांकावर असलेला अव्वल भारतीय गोल्फर आहे.