ETV Bharat / sports

World police games : वर्ल्ड पोलीस गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या भारतीय पैलवानांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

कॅनडामध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस गेम्स स्पर्धेमध्ये भारताने गोल्ड मेडल मिळवले आहे. यामध्ये तीन भारतीय खेळाडू होते. हे विजेते खेळाडू आज भारतात परत आले असून पुणे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Darshan of Rich Dagdusheth Ganapati
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन
author img

By

Published : Aug 2, 2023, 3:37 PM IST

पुणे : वर्ल्ड पोलीस गेम्स मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारे तिन्ही पैलवान मायदेशी परतले आहेत. पुणे विमानतळावर त्यांचें जंगी स्वागत करण्यात आले आहे. विमानतळावरून तिन्ही विजेत्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात जाऊन गणपतीच दर्शन घेतले आहे. यामध्ये पैलवान नरसिंग यादव (गोल्ड मेडल), पैलवान विजय चौधरी (गोल्ड मेडल), पैलवान राहुल आवारे ( गोल्ड मेडल) यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले आहे.

कुस्तीमध्ये भारताला जागतिक नाव : कुस्तीमध्ये भारताला जागतिक नाव मिळवून देण्याचे काम या तिन्ही पैलवानाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कुस्तीचा सहभाग सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर यामुळे मोठा होणार आहे. महाराष्ट्रातील कुस्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी, तिचा प्रसार आणि प्रचार व्हावा असे प्रत्येकाला वाटते. परंतु त्या प्रमाणात आपली खेळाडू खेळत नसल्याची टीका होत असते. परंतु या मातीतल्या खेळाला या तिन्ही खेळाडूंनी आता जगभरात नाव मिळवून दिले आहे.

भारतीय पैलवानांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन : कॅनडामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना या तिन्ही खेळाडूने गोल्ड मेडल मिळवून आपले प्राविण्य दाखवून दिले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक भारतीय कुस्तीपटू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळण्यासाठी तयार होत आहेत. ही प्रेरणा नव्या कुस्तीपटूसाठी खूप मोठी आहे.

खेळाडू अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी : कॅनडा येथील विनिपेग येथे आयोजित वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाच्या खेळाडू अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कुस्ती स्पर्धेत विजय चौधरी, राहुल आवारे, नरसिंग यादव यांनी आपापल्या वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. पोलिस आणि अग्निशमन दलासाठी या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राचे हे तीनही मल्ल महाराष्ट्र पोलीस दलात उच्च पदावर कार्यरत असून तिघांनीही या वर्षीच्या अखिल भारतीय पोलिस गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.

हेही वाचा :

  1. Stuart Broad Retirement : युवराज सिंगने 6 षटकार ठोकलेल्या गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, युवी म्हणाला..
  2. Jasprit Bumrah : अखेर प्रतीक्षा संपली!, जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन
  3. Ind Vs Wi 3rd Odi: भारताचा एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजविरोधात 200 धावांनी विजय, कर्णधार हार्दिकने दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.