ETV Bharat / sports

अनुराग ठाकूर यांची ऑलिम्पिकविषयी मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

author img

By

Published : Sep 5, 2021, 6:13 PM IST

देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर अॅथलिटशी चर्चा तसेच इतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंगळुरूला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी 2024 आणि 2028 ऑलिम्पिकबद्दलचा प्लॅन सांगितला.

अनुराग ठाकूर यांची ऑलिम्पिकविषयी मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
अनुराग ठाकूर यांची ऑलिम्पिकविषयी मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

बंगळुरू - आगामी 2024 आणि 2018 ऑलिम्पिकसाठी मोठी योजना आखल्या जाणार आहेत, जेणेकरून भारताची या ऑलिम्पिकमध्ये आणखी स्थिती सुधारेल, अशी प्रतिक्रिया भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. अनुराग ठाकूर हे अॅथलिटसोबत चर्चा तसेच इतर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बंगळुरूला आले होते. यावेळी त्यांनी पुढील प्लॅन सांगितला.

अनुराग ठाकूर म्हणाले की, सर्व खेळाच्या फेडरेशनला महत्वाची भूमिका निभवावी लागेल. आपल्याला यासाठी एक खास प्लॅन आखून त्यावर मिळून काम करावे लागेल. जेणेकरून 2024 आणि 2028 ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्थितीत आणखी सुधारणा होईल.

मोदी सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने लोकांची खेळाप्रती धारणा बदलली. ज्याचा परिणाम आपल्याला ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमधून पाहायला मिळाला. सरकारच्या प्रोत्साहानामुळेच भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, असा दावा देखील अनुराग ठाकूर यांनी केला.

खेळात, सर्वात महत्वाचे म्हणजे दृष्टीकोन बदलण्याची गरज असते. जेव्हा सरकार प्रत्येक सुविधा देत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खेळाडूंशी बोलून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. याचा प्रभाव समाजातील प्रत्येक घटकावर पडतो. क्रिकेट खेळाला जो रिस्पान्स मिळत होता. तो आता ऑलिम्पिकमधील खेळांना देखील मिळत आहे, असे देखील ठाकून म्हणाले.

दरम्यान, भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. यंदाच्या या स्पर्धेत भारताने सर्वश्रेष्ठ कामगिरीसह 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदकांसह पदकतालिकेत 24वे स्थान पटकावले. भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 8 पदके जिंकली. तर शुटिंगमध्ये 5, बॅडमिंटनमध्ये 4, टेबल टेनिस आणि तिरंदाजीत प्रत्येक 1-1 पदक जिंकले.

हेही वाचा - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगिरी, 5 सुवर्णसह जिंकली 19 पदके

हेही वाचा - Tokyo Paralympics : प्रमोद भगत-पलक कोहली जोडी, मिश्र दुहेरीच्या कास्य पदकाच्या सामन्यात पराभूत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.