ETV Bharat / sports

Venkatesh Prasad advises KL Rahul : माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादचा केएल राहुलला काउंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या केएल राहुलला भारताच्या माजी खेळाडूने इंग्लंडला जाऊन काऊंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या सततच्या खराब परफाॅर्मन्समुळे कसोटी संघातील त्याचे स्थानसुद्धा धोक्यात आले आहे.

Venkatesh Prasad advises KL Rahul
माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादचा केएल राहुलला काउंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला
author img

By

Published : Feb 20, 2023, 5:49 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज केएल राहुलची कामगिरी काही विशेष ठरली नाही. अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी खेळाडू त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्याची मागणी करीत आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी अनेक वेळा ट्वीट करून केएल राहुलच्या कसोटी संघात राहण्यास विरोध केला आहे. मात्र, यावेळी व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट करून स्पष्टीकरण देताना केएल राहुलचा बचाव केला आहे. ट्विट करून केएल राहुलला पाठिंबा देत व्यंकटेश म्हणाले की, काही लोकांना असे वाटते की, माझे केएल राहुलशी काही वैयक्तिक वैर आहे पण प्रत्यक्षात तसे नाही. त्याने असेही म्हटले आहे की, केएल राहुलने नेहमीच चांगले काम करावे अशी माझी नेहमीच इच्छा असते.

  • A few people thinking i have something personal against KL Rahul. Infact it is the opposite. I wish well for him and playing him in such form was never going to enhance his confidence. For him to earn his place back in Test cricket, now that the domestic season has ended, cont.

    — Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केएल राहुलची कामगिरी निराशाजनक : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या नागपूर कसोटी आणि दिल्ली कसोटीत केएल राहुलची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. केएल राहुलने दोन्ही कसोटीच्या तीन डावांत एकूण 38 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्कोअर 20 धावा, 17 धावा आणि 1 धाव होता. माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादनेदेखील केएल राहुलच्या फॉर्मबद्दल म्हटले आहे की, अशा फॉर्ममध्ये खेळून त्याचा आत्मविश्वास कधीही वाढणार नाही. तो म्हणाला की राहुल पुन्हा फॉर्ममध्ये येईल आणि भारताच्या कसोटी संघात आपले स्थान निश्चित करेल अशी माझी इच्छा आहे.

  • Rahul needs to play County cricket in England , score runs and earn his place back, much like Pujara did when he was dropped. Playiing Test Cricket for the country and doing everything possible to get back in form will be the best answer. But will it be possible to skip the IPL?

काउंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला : 90 च्या दशकात भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज असलेल्या व्यंकटेश प्रसादनेही ट्विट करून कसोटी क्रिकेटमध्ये फॉर्म परत मिळवण्यासाठी एक खास सल्ला दिला आहे. प्रसादने ट्विट केले आहे की चेतेश्वर पुजाराच्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी राहुलला इंग्लंडला जाऊन काऊंटी क्रिकेट खेळावे लागेल आणि भारताच्या कसोटी संघात आपले स्थान परत मिळवण्यासाठी तेथे धावा कराव्या लागतील. व्यंकटेशने केएल राहुलला आणखी एक सल्ला दिला आहे की, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे आणि फॉर्ममध्ये येण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे हेच त्याच्या विरोधकांना सर्वोत्तम उत्तर असेल.

बीसीसीआयने उपकर्णधारपद घेतले काढून : केएल राहुलच्या खराब फॉर्मनंतर बीसीसीआयच्या निवड समितीने त्याला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवले आहे. यासोबतच बीसीसीआयने तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी नवीन उपकर्णधाराचा निर्णय कर्णधार रोहित शर्मावर सोडला आहे. कसोटी संघाच्या या पदासाठी तीन खेळाडूंना प्रमुख दावेदार मानले जात आहे. कारण संघाचा उपकर्णधार होण्यासाठी कोणत्याही खेळाडूने सतत संघाचा भाग असणे किंवा संघातच राहिले पाहिजे, असे म्हटले जाते. असे तीन बलाढ्य खेळाडू उपकर्णधारपदाच्या उमेदवारांच्या यादीत आहेत.

हेही वाचा : KL Rahul Removed From Vice Captaincy : केएल राहुलला टीम इंडियाच्या उपकर्णधारपदावरून हटवले; श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अश्विन प्रबळ दावेदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.