ETV Bharat / sports

Delhi Premier League 2022 : दिल्ली प्रीमियर लीगला 15 जुलैपासून होणार सुरुवात; अकरा संघाचा असणार सहभाग - Football Delhi President Shaji Prabhakaran

दिल्ली प्रीमियर लीग ( Delhi Premier League ) लवकरच सुरू होणार आहे. लीगचे सर्व सामने आंबेडकर स्टेडियम आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम या दोन ठिकाणी होणार आहेत.

Delhi Premier League
Delhi Premier League
author img

By

Published : Jul 12, 2022, 6:19 PM IST

नवी दिल्ली: दिल्ली प्रीमियर लीगची पहिली फुटबॉल स्पर्धा 15 जुलैपासून ( DPL starts from 15th July ) आंबेडकर स्टेडियम वर सुरू होणार आहे. लीग दुहेरी राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल, ज्यामध्ये सर्व 11 संघ ( Participation of 11 teams ) 20-20 सामने खेळतील. दोन महिन्यांहून अधिक कालावधीत एकूण 110 सामने खेळवले जातील. दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात 7 लाख रुपयांची विक्रमी बक्षीस रक्कम ( Record prize of Rs 7 lakh ) असणार आहे.

फुटबॉल दिल्लीचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन ( Football Delhi President Shaji Prabhakaran ) म्हणाले, दिल्लीतील फुटबॉलची स्पर्धात्मक रचना सुधारण्याच्या प्रयत्नात फुटबॉल प्रीमियर लीग सुरू करत आहे. आम्ही अव्वल-स्तरीय लीगमधील प्रत्येक संघाच्या सामन्यांची संख्या 10 वरून 20 पर्यंत वाढवत आहोत. आमची प्रणाली खेळाडूंना चांगले स्पर्धात्मक वातावरण प्रदान करेल. प्रथमच, फुटबॉल दिल्लीने शीर्ष-स्तरीय लीगचा भाग होण्यासाठी नवीन क्लब म्हणून थेट प्रवेश केला आहे. अशा प्रकारे वाटिका एफसी बोली प्रक्रियेद्वारे प्रीमियर लीगमध्ये सामील झाली आहे.

ते पुढे म्हणाले, दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ( Delhi Premier League ) सहभागी होणारे क्लब दिल्लीचा फुटबॉल पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. दिल्लीतील आमचे क्लब येत्या हंगामात भारतातील अव्वल लीगमध्ये भाग घेताना दिसतील. साखळीतील पहिला सामना हिंदुस्थान एफसी आणि वाटिका एफसी यांच्यात आंबेडकर स्टेडियमवर दुपारी 4.15 वाजता खेळवला जाईल.

दिल्ली प्रीमियर लीगमधील 11 संघ -

दिल्ली एफसी, हिंदुस्तान एफसी, रॉयल रेंजर्स एफसी, फ्रेंड्स युनायटेड एफसी, गढवाल एफसी, तरुण संघ एफसी, रेंजर्स एससी, सुदेवा दिल्ली एफसी, उत्तराखंड एफसी, इंडियन एअर फोर्स आणि वाटिका एफसी हे संघ दिल्ली प्रीमियर लीगचा भाग आहेत.

हेही वाचा - Womens Hockey World Cup 2022 : भारताने कॅनडाला 3-2 ने केले पराभूत, सविता पुनियाच्या उत्कृष्ट गोलकीपिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.