अबू धाबी : विश्वचषकापूर्वी अर्जेंटिनाच्या अंतिम सराव सामन्यात ( FIFA World Cup Practice Match ) लिओनेल मेस्सी मैदानावर राहिला ( Lionel Messi Stayed on Field Throughout ) आणि त्याच्या संघाने युएईला ५-० ने पराभूत करताना ( Argentina Thrashed The UAE 5-0 ) एक गोल केला. यासह जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाने आपला ( Argentina Beat UAE 5-0 ) अपराजित राहण्याचा सिलसिला ३६ सामन्यांपर्यंत वाढवला.
-
🏆 #SelecciónMayor - Amistoso
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⚽ @Argentina 🇦🇷 5 (Julián Álvarez, Ángel Di María x2, Lionel #Messi y Joaquín Correa) 🆚 Emiratos Árabes Unidos 🇦🇪 0
👉 ¡Final del partido!
🔜 El próximo martes será el debut de la Albiceleste en #Qatar2022. ¡Vamos #TodosJuntos! pic.twitter.com/LUaepes5ho
">🏆 #SelecciónMayor - Amistoso
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 16, 2022
⚽ @Argentina 🇦🇷 5 (Julián Álvarez, Ángel Di María x2, Lionel #Messi y Joaquín Correa) 🆚 Emiratos Árabes Unidos 🇦🇪 0
👉 ¡Final del partido!
🔜 El próximo martes será el debut de la Albiceleste en #Qatar2022. ¡Vamos #TodosJuntos! pic.twitter.com/LUaepes5ho🏆 #SelecciónMayor - Amistoso
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 16, 2022
⚽ @Argentina 🇦🇷 5 (Julián Álvarez, Ángel Di María x2, Lionel #Messi y Joaquín Correa) 🆚 Emiratos Árabes Unidos 🇦🇪 0
👉 ¡Final del partido!
🔜 El próximo martes será el debut de la Albiceleste en #Qatar2022. ¡Vamos #TodosJuntos! pic.twitter.com/LUaepes5ho
मध्यंतरापूर्वी मेस्सीने संघासाठी चौथा गोल केला. तत्पूर्वी, त्याने 17व्या मिनिटाला अर्जेंटिनाला आघाडी मिळवून देणाऱ्या ज्युलियन इव्हारेसच्या गोलमध्येही सहकार्य केले. संघाकडून एंजल डी मारियाने दोन, तर जोकुन कोरियाने एक गोल केला. मेस्सीने अर्जेंटिनासाठी गेल्या पाच सामन्यांमध्ये 10 गोल केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय गोलांची संख्या 91 वर पोहोचली आहे.
अर्जेंटिना 22 नोव्हेंबर रोजी क गटात सौदी अरेबियाविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. दुसरीकडे, नवोदित निकलस फाल्क्रुगच्या गोलच्या जोरावर जर्मनीने मस्कतमध्ये ओमानवर १-० अशी मात केली. क्रिस्टोफ पिएटेकच्या उशीरा गोलमुळे पोलंडने वॉर्सा येथे चिलीवर १-० अशी मात केली. या सामन्यात स्टार खेळाडू रॉबर्ट लेवांडोस्की खेळला नाही, पण तो विश्वचषक स्पर्धेत 22 नोव्हेंबर रोजी मेक्सिकोविरुद्ध संघाच्या पहिल्या सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा आहे.
स्पेनमधील गिरोना येथे झालेल्या शेवटच्या सराव सामन्यात मेक्सिकोचा स्वीडनकडून १-२ पराभव झाला. क्रोएशियाने रियाधमधील आंद्रेज क्रॅमरिकच्या गोलच्या जोरावर सौदी अरेबियाचा 1-0 असा पराभव केला.