ETV Bharat / sports

कतारविरुद्ध पराभूत होऊनही भारत फिफा विश्वचषकासाठी पात्र होऊ शकतो; कसं ते जाणून घ्या

FIFA World Cup 2026 : २०२६ फिफा विश्वचषकात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक संघ पाहायला मिळतील. या विश्वचषकासाठी आशिया खंडाला मागील आवृत्तीपेक्षा दुप्पट स्लॉटचं वाटप करण्यात आलंय. यामुळे यंदा भारताकडे प्रथमच फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याची संधी असेल.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 10:46 PM IST

हैदराबाद FIFA World Cup 2026 : भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी, २०२६ फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या पात्रता फेरीतील दुसऱ्या लीग सामन्यात कतारविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागला. ओडिशातील कलिंगा स्टेडियमवर आशियाई चॅम्पियन कतारनं संपूर्ण ९० मिनिटं वर्चस्व राखलं. या पराभवामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या विश्वचषकाच्या स्वप्नाला धक्का बसलाय. मात्र अजूनही भारत फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतो.

भारताच्या गटाची स्थिती : विश्वचषकाच्या दुसऱ्या पात्रता फेरीत भारत 'अ' गटात आहे. या गटात भारतासह कुवेत, कतार आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर कतार गटात पहिल्या स्थानावर असून, कुवेत दुसऱ्या स्थानावर आहे. कतारविरुद्ध पराभवानंतर भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. भारतानं पहिल्या सामन्यात कुवेतविरुद्ध १-० असा विजय मिळवला होता. सध्या भारत आणि कुवेतचे समान गुण असले तरी, कुवेत (+ ३) चांगल्या गोल फरकामुळे भारताच्या (- २) वर आहे.

पात्रता स्वरूप : गट 'अ' मधील सर्व चार संघ नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात पात्रता सामने खेळत आहेत. टीम इंडियाला तिसऱ्या फेरीत जाण्यासाठी आणि २०२७ एफसी आशियाई कपमध्ये स्थान पक्क करण्यासाठी आपल्या गटात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवावं लागेल. भारतानं अव्वल दोनमध्ये स्थान मिळवलं, तर ते २०२४ मध्ये तिसऱ्या फेरीच्या ड्रॉमध्ये सामील होतील. तेथे ते इतर गटातील विजेते आणि उपविजेत्यांशी स्पर्धा करतील.

पात्रतेची आणखी एक संधी : तिसऱ्या फेरीत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ २०२६ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. मात्र येथे जर भारत पहिल्या दोनमध्ये आला नाही, तरीही भारताकडे पात्रतेची आणखी एक संधी असेल. तिसऱ्या फेरीत प्रत्येक गटांतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ चौथ्या फेरीत प्रवेश करतील.

चौथी आणि पाचवी पात्रता फेरी : चौथ्या फेरीमध्ये, तिसर्‍या फेरीतील उर्वरित संघ प्रत्येकी तीन संघांच्या दोन गटात विभागले जातील. हे संघ तटस्थ ठिकाणी एकमेकांशी एकमेव सामना खेळतील. प्रत्येक गटातील विजेता विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरेल आणि उपविजेता पाचव्या फेरीत प्रवेश करेल. पाचव्या फेरीत, संघ प्रत्येकी दोन सामने (घरच्या आणि विरोधकाच्या मैदानावर) खेळतील. यातील विजेता इंटर-कंफेडरेशन प्ले-ऑफसाठी पात्र ठरेल.

हेही वाचा :

  1. फिफा विश्वचषक पात्रता फेरी, कतारकडून भारताचा पराभव
  2. फलंदाजांच्या 'टाईम आउट'नंतर गोलंदाजांना 'स्टॉप क्लॉक'ची राहणार धास्ती, आयसीसीचा काय आहे नवा नियम?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.