नवी दिल्ली: फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये शुक्रवारी ब गटातील झालेल्या सामन्यात इराणने शेवटच्या 3 मिनिटांत 2 गोल करत वेल्सचा पराभव केला. या सामन्यादरम्यान वेल्सचा गोलरक्षक वेन हेनेसीला रेड कार्ड दाखवण्यात आले. (Wayne Hennessey). सामन्याच्या 86व्या मिनिटाला त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले. (Wayne Hennessey red card).
-
Will this be a game-changing moment? 🔴#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/tJATNCZRCu
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Will this be a game-changing moment? 🔴#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/tJATNCZRCu
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 25, 2022Will this be a game-changing moment? 🔴#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/tJATNCZRCu
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 25, 2022
केवळ तिसरा गोलरक्षक : वेल्सचा वेन हेनेसी हा वर्ल्ड कप इतिहासात रेड कार्ड मिळवणारा केवळ तिसरा गोलरक्षक आहे. त्याआधी 1994 मध्ये इटलीचा गोलरक्षक जियानलुका पेग्लियुका याला नॉर्वेविरुद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या इटुमलेंग कुनेला 2010 मध्ये उरुग्वेविरुद्ध रेड कार्ड मिळाले होते.
या विश्वचषकातील पहिले रेड कार्ड : हेनेसी हा FIFA विश्वचषक 2022 मधील पहिला खेळाडू आहे ज्याला रेड कार्ड दाखवण्यात आले. वर्ल्डकपमधील एकूण खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, हेनेसी हा रेड कार्ड मिळवणारा १७४ वा खेळाडू ठरला आहे. इराणचा स्ट्रायकर तारेमीला बॉक्सच्या बाहेर रोखण्यासाठी हेनेसीने त्याला धोकादायकपणे टॅकल केले होते. हेनेसीच्या जागी राखीव गोलरक्षक डेनी वॉर्डने गोलरक्षण केले.