नवी दिल्ली : विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून संघाचा पराभव झाल्यानंतर (Morocco vs Portugal) पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंटोस (Fernando Santos) यांनी आता आपले पद सोडले आहे. (portugal part ways with coach fernando santos). या सामन्यात सॅंटोसने स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला पूर्वार्धात बेंचवर बसवले होते. त्यांच्या या निर्णयावरून फार गदारोळ झाला होता. संघाच्या पराभवानंतर अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. अखेर प्रशिक्षक सॅंटोस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
-
Momentos 𝗛𝗶𝘀𝘁𝗼́𝗿𝗶𝗰𝗼𝘀. 📸🎞 Thanks for the memories, Fernando Santos. 👏👏#VesteABandeira #WearTheFlag pic.twitter.com/U8eIMvmUaa
— Portugal (@selecaoportugal) December 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Momentos 𝗛𝗶𝘀𝘁𝗼́𝗿𝗶𝗰𝗼𝘀. 📸🎞 Thanks for the memories, Fernando Santos. 👏👏#VesteABandeira #WearTheFlag pic.twitter.com/U8eIMvmUaa
— Portugal (@selecaoportugal) December 15, 2022Momentos 𝗛𝗶𝘀𝘁𝗼́𝗿𝗶𝗰𝗼𝘀. 📸🎞 Thanks for the memories, Fernando Santos. 👏👏#VesteABandeira #WearTheFlag pic.twitter.com/U8eIMvmUaa
— Portugal (@selecaoportugal) December 15, 2022
सॅंटोसच्या प्रशिक्षणाखाली जिंकला युरो कप : कतारमध्ये खेळवण्यात येत असलेला फिफा विश्वचषक अंतिम टप्प्यात आला असून रविवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात सामना रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकात अनेक उलटफेर पाहायला मिळाले. स्पर्धेत अनेक छोट्या संघांनी मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला, यापैकी एक संघ मोरोक्को देखील होता. मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य पोर्तुगालचा पराभव केला होता. सॅंटोसच्या प्रशिक्षणाखाली पोर्तुगालने 2016 चा युरो कप आणि नेशन्स लीग स्पर्धा जिंकली होती. पोर्तुगालच्या फुटबॉल महासंघाने एका निवेदनात म्हटले आहे की, 68 वर्षीय सॅंटोससोबत सप्टेंबर 2014 मध्ये सुरू झालेला यशस्वी प्रवास संपुष्टात आता येत आहे. एफपीएफने सांगितले की ते आता पुढील राष्ट्रीय प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत.
-
𝗢𝗯𝗿𝗶𝗴𝗮𝗱𝗼 por tudo, Mister Fernando Santos. 🤝 #VesteABandeira pic.twitter.com/L20QjwfQve
— Portugal (@selecaoportugal) December 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">𝗢𝗯𝗿𝗶𝗴𝗮𝗱𝗼 por tudo, Mister Fernando Santos. 🤝 #VesteABandeira pic.twitter.com/L20QjwfQve
— Portugal (@selecaoportugal) December 15, 2022𝗢𝗯𝗿𝗶𝗴𝗮𝗱𝗼 por tudo, Mister Fernando Santos. 🤝 #VesteABandeira pic.twitter.com/L20QjwfQve
— Portugal (@selecaoportugal) December 15, 2022
होसे मोरिन्हो नवे प्रशिक्षक? : सॅंटोस यांच्या राजीनाम्यानंतर आता अनेकांचे नाव पोर्तुगालच्या प्रशिक्षक पदासाठी समोर येते आहे. यात वादग्रस्त होसे मॉरिन्हो यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मॉरिन्हो हे जागतिक फुटबॉलमधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक गणले जातात. मात्र त्यांची कारकीर्द तेवढीच वादग्रस्त राहिली आहे. मॉरिन्हो यांनी या आधी पोर्तो, चेल्सी व मॅनचेस्टर युनायटेड सारख्या प्रतिष्ठित फुटबॉल क्लबचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. ते सध्या सिरी ए क्लब एएस रोमा चे प्रशिक्षक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरो 2024 पूर्वी फेडरेशनला मॉरिन्हो यांना पोर्तुगालचा नवा प्रशिक्षक बनवायचा आहे.