ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : अंतिम सामन्यापूर्वी कतारमध्ये सगळीकडे अर्जेंटिनाच्या फॅन्सची क्रेझ!

अर्जेंटिनाला पाठिंबा देण्यासाठी (Fance vs Argentina final match) फुटबॉलप्रेमी केवळ अर्जेंटिनातूनच नाही तर युरोप आणि अमेरिकेतूनही कतारमध्ये पोहोचत आहेत. अर्जेंटिनाचे आतापर्यंत एकूण किती चाहते कतारला पोहोचले आहेत याची अधिकृत आकडेवारी मात्र उपलब्ध नाही. (argentina fans in qatar)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 17, 2022, 5:39 PM IST

दोहा : फुटबॉल वेड्या अर्जेंटिनाचे चाहते त्यांचा देश आर्थिक संकटात असतानाही केवळ अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या कष्टाने कतार गाठत आहेत. (argentina fans in qatar). रविवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. (Fance vs Argentina final match). अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा उत्साह आणि जोश दोहाच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाहायला मिळतो आहे. ते 'मुचाचोस' नावाचे गाणे गात आहेत जे अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी जणू विश्वचषकाचे अनधिकृत एंथम बनले आहे. (FIFA World Cup 2022)

कतारला पोहचण्यासाठी सर्व बचत खर्च केली : दोहा मधील सौक वक्फ मार्केटमध्ये अर्जेंटिनाच्या आकाशी निळ्या आणि पांढर्‍या पट्टेदार जर्सी घातलेल्या तरुणांच्या भोवती स्थानिक आणि पर्यटकांचा जमाव जमला होता. ते तरुण हातात अरबी आणि इंग्रजी भाषेतील बॅनर घेऊन लुसेल स्टेडियमवर होणाऱ्या फायनलसाठी तिकीटांची मागणी करत होते. हा २४ वर्षांचा चाहता बेलेन गोडोई म्हणाला, "फुटबॉल माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी माझ्या कुटुंबाला सोडून इथे आलो आहे. मी माझी सर्व बचत खर्च केली आहे. मी आता ब्युनोस आयर्सला परत जाऊन माझे भाडे कसे भरणार आहे हे मला माहित नाही. पण मी इथे जगलेले जीवन कोणीही हिरावून घेऊ शकत नाही". गोडोईने अर्जेंटिनाचा जवळपास प्रत्येक सामना तिकीट खरेदी करून पाहिला आहे.

जगभरातून अर्जेंटिनाचे लाखो चाहते पोहचले : अर्जेंटिनाचे अनेक चाहते आहेत जे आपल्या मौल्यवान वस्तू विकून येथे पोहोचले आहेत. त्यापैकी 34 वर्षीय क्रिस्टियन मशिनेली एक आहे जिने अर्जेंटिनाला विश्वचषकात खेळताना पाहण्यासाठी चक्क आपला टोयोटा ट्रक विकला! मशिनेली म्हणाल्या, "मी केवळ यासाठी माझा ट्रक विकला. त्यामुळेच आता माझ्याकडे फायनलचे तिकीट खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. आम्ही अर्जेंटिनाचे लोकं फुटबॉलचे वेडे आहोत आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो". अर्जेंटिनाचे एकूण किती चाहते कतारला पोहोचले आहेत याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. अर्जेंटिनाला पाठिंबा देण्यासाठी फुटबॉलप्रेमी केवळ अर्जेंटिनातूनच नाही तर युरोप आणि अमेरिकेतूनही कतारमध्ये पोहोचत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.