नई दिल्ली - भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने सांगितलं की, मागील 15 महिने आमच्यासाठी कठिण होते. कारण संपूर्ण संघ बंगळुरूमध्ये एका कँपमध्ये ट्रेनिंग करत होता. आम्ही आमच्या कुटुंबियांना भेटू शकत नव्हतो. पदक जिंकण्यासाठी संपूर्ण संघाने कठोर परिश्रम घेतले.
मनप्रीत सिंगने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली. या दरम्यान त्याने सांगितलं की, खूप वर्षांपासून हॉकीमध्ये भारताने पदक जिंकलं नव्हतं. सिंगने राजधानी दिल्लीत झालेल्या स्वागतावर आनंद व्यक्त केला.
कर्णधार मनप्रीत सिंग म्हणाला, उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला फोन केला होता. यावेळी संपूर्ण संघातील खेळाडूंशी ते बोलले. त्यांनी विश्वास दाखवला की, संपूर्ण देश आणि ते आमच्यासोबत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही आणि कास्य पदकासाठीच्या सामन्याची तयारी केली पाहिजे. मनप्रीत सिंगने सांगितलं की, कास्य पदक जिंकल्यानंतर देखील मोदींचा फोन आला. यात त्यांनी संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व असल्याचे सांगितलं.
अंतिम सामन्याविषयी सांगताना मनप्रीत सिंग म्हणाला, आमचे लक्ष्य हे होतं की, आम्ही आमचे बेस्ट देऊन सामना जिंकू. 60 मिनिटे संपूर्ण संघ त्वेषाने खेळला. यामुळे आम्ही कास्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरलो. या ऑलिम्पिकमध्ये इतिहास बनला. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकली. याचे कारण दुसऱ्या खेळाला देखील देशातील नागरिक फॉलो आणि सपोर्ट करत आहेत.
मनप्रीत पुढे म्हणाला, आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील आणि एक विशेष लक्ष्य निर्धारित केलं पाहिजे. कारण जर निश्चित ध्येयावर लक्ष्य केंद्रित केल्यास तो निश्चित रुपाने प्राप्त होईल. तो म्हणाला की, कुटुंबियांना भेटण्यासाठी मी उत्साहित आहे.
दरम्यान, भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा 5-4 ने पराभव करत 41 वर्षांनंतर कास्य पदक जिंकलं आहे.
हेही वाचा - नीरज चोप्रा प्रशिक्षक वाद : नाईक यांनी केलं एएफआय प्रमुख सुमरिवाला यांच्या वक्तव्याचं खंडन
हेही वाचा - कुस्ती महासंघाने विनेश फोगाटचं केलं निलंबन, जाणून घ्या काय आहे प्रकरण